एक्स्प्लोर

वाशी टोलनाक्यावर रॅपिड अॅक्शन फोर्स, ईस्टन फ्री वे आणि चेंबूरवर दोन्ही मार्गाने पोलीस, आझाद मैदानपर्यंत मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी प्रशासन सज्ज असून रॅपिड अॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची  तयारी केली आहे. 

मुंबई : मनोज जरांगे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी २ वाजता मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत.  मराठा आरक्षण मागणीसाठी  वाशीमध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता  आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड अॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची  तयारी केली आहे. 

मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाशी टोलनाका येथे   आता रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. 

जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबई पोलीस आणि प्रशासन सज्ज

मुंबई पोलिस देखील सज्ज  झाले आहेत. जरांगे आणि मराठा आंदोलकांच वाशीहून मुंबईत येण्याचा ठरलं तर, मुंबई पोलिसांनी चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची तयारी केली आहे.   मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात  मराठा आंदोलन वाशीहून चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर चेंबूरहून दोन मार्गे आझाद मैदानात जाता येतं.यात एक ईस्टर्न फ्री वे  आणि दुसरा चुनाभट्टी सायन सिटी मार्ग हा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस या दोन्ही मार्गावर आंदोलकांना जाण्यासाठी तयारी केलीय.मात्र ईस्टन फ्री वे नेच आंदोलकांनी जावं यासाठी पोलीस विनंती करणार आहेत.  

ईस्टन फ्री वे ने येण्याची करणार विनंती

 आज 26 जानेवारी असल्याने सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे सिटी रस्त्याने वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे 16.8 किलोमीटरचा ईस्टर्न फ्री वे  हा मार्ग पूर्ण करत मराठा आंदोलक सहज आझाद मैदानात पोहोचू शकतील. त्यामुळे पोलीस मराठा आंदोलकांना विनंती करतील अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र यात एक पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या या वाशीतच असताना पूर्ण करतं का की त्यांना मुंबईत यायला लावतं.

हे ही वाचा :

आझाद मैदानातून एल्गार होणार की वाशीतच गुलाल उधळणार? जरांगे पाटील दोन वाजता कोणती घोषणा करणार?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget