एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2020 | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात...

राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या संकंटाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे.

मुंबई : राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही आणि उद्याही हृदयात राहील. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मी काम केलं आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवतो. उद्धव ठाकरेंसोबत माझं नेहमी बोलणं होतं. मात्र राज्यातील राजकारणात आणि पक्षात माझी सध्या काही भूमिका नाही. मी सध्या दिल्लीत काम करतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं, याबाबत राज्यातील नेते निर्णय घेतात. राज्यातील राजकीय निर्णयांवर राज्यातील निर्णय देऊ शकतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.

लॉकडाऊन करणे उपाय नाही

राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या संकंटाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र लॉकडाऊन सुरु ठेवणे बंद केलं पाहिजे. आज लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावाचे नियम पाळून आपण जनजीवन सुरळीत केलं पाहीजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.

इतर बातम्या

Majha Maharashtra Majha Vision | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? काय म्हणाले नितीन गडकरी?

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Party hearing in SC: धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आयोगाने का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आयोगाने का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Radheshyam Mopalwar Government Project: माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आयोगाने का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आयोगाने का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Embed widget