एक्स्प्लोर

Maharashtra Politics: सुशांत सिंग, दिशा सालीयन सारखी प्रकरणे घडली तर लोक कसे येतील? आदित्य यांच्या आरोपांवर शिंदे गटाचा उलटप्रश्न

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी परराज्यात मुलाखती का असा प्रश्न करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्याला आज शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra Politics:  पश्चिम बंगाल आणि चेन्नईमधून विद्यार्थी जास्त मिळतात. त्यामुळे संबंधित कंपनीने तिथे मुलाखती घेतल्या. कॅबिनेट मंत्री राहूनही माहिती न घेता बोलणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर (Kiran Pawaskar) यांनी केला. सुशांतसिंग, (Sushant Singh Rajput) दिशा सालीयन (Disha Salian) केसेस घडल्या तर लोक कसे येतील, असा उलट सवालही त्यांनी केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील प्रकल्पासाठी नियुक्त असलेल्या कंपनीने चेन्नई व इतर राज्यात मुलाखती घेतल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्राचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आज शिंदे गटाच्यावतीने प्रत्युत्तर देण्यात आले. 

किरण पावस्कर यांनी म्हटले की, ,आदित्य ठाकरे यांनी अप्पो इन्फ्राटेक कंपनीवर आरोप केले. हा सगळा प्रकार कीव येण्यासारखा आहे. संबंधित कंपनीने महाराष्ट्रात दोन वेळेस मुलाखती घेतल्या होत्या. मुंबईत तीन ठिकाणी मुलाखती झालेल्या. तर 9 जागांसाठीच्या मुलाखती राज्याबाहेर झाल्याचे पावस्कर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले असल्याचा आरोप पावस्कर यांनी केला. कोणी कानात सांगतो तसे उड्या मारणे बंद करा, अशी बोचरी टीकाही पावस्करांनी आदित्य यांच्यावर केली.  चित्रपटसृष्टीत सुशांतसिंग, दिशा सालीयन सारखी प्रकरणे घडत असतील तर लोक कशी येतील, असा सवालही त्यांनी केला.  एनआयए तपास प्रलंबित आहे. जेव्हा चौकशी होईल त्यावेळी वाझेंचे प्रकरणातील सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले. 

बाळासाहेबांप्रमाणे एकनाथ शिंदे मेळावा घेणार 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेणार असल्याचे पावस्कर यांनी सांगितले. यापूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुखांचे विचार लुटण्यासाठी लोक येत असे. आता सोनियांचे विचार राहिले असून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली असल्याची टीका पावस्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कोथळा, वार, घुसून मारणे असे काही सोडले तर उद्धव यांच्याकडे बोलण्यासाठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला. 

शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीबाबत सरकारने दबाव आणला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्क ही क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेटची खेळपट्टी, मैदान उखडून टाकली तर जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी केला. शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेणार, त्यासाठी कोणता गनिमी कावा वापरणार, याबाबत स्पष्टपणे का सांगत नाही असा सवाल त्यांनी शिवसेना नेत्यांना केला. आमचा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे पावस्कर यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget