एक्स्प्लोर

Andheri East Bypoll:अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार? भाजप नेत्यांची आज बैठक, शिंदे-फडणवीसही चर्चा करणार

Andheri East Bypoll: भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी हे मुंबईत दाखल झाले असून अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक (Andheri East bypoll) बिनविरोध व्हावी यासाठीची चर्चा सुरू असताना आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज 'वर्षा' बंगल्यावर बैठक होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. 

रविवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीतही पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटले हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. या पोटनिवडणुकीत भाजप विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज भाजप नेत्यांच्या बैठकी पार पडणार आहेत. 

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून देखील  नाट्य घडले होते. मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या लटके यांना राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. 

तरीही निवडणूक होणार 

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरी अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत आहे. या दोन मुख्य प्रतिस्पर्ध्यांशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Embed widget