एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान! अडीच वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही : अजित पवार

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली.

Maharashtra Political Crisis : राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंदे सरकारनं बहुमताची परीक्षा पास केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. आजही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत खोचक टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले की, आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता. विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस. अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकही महत्वाचं पद त्यांनी सोडलं नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी टोलेबाजी केली. 

शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर रस्तेविकास महामंडळाचं खातं का दिलं?

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत हे सतत का सांगावं लागतं, याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलं नाही. फडणवीसजी तुम्ही इतकं शिंदे यांचं कौतुक करत होते मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना रस्ते विकासचं खातं का दिलं, त्यांना महत्वाचं खातं का दिलं नाही. शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर रस्तेविकास महामंडळाचं खातं का दिलं, जनतेची संबंधित खातं का दिलं नाही. महाराष्ट्रही याबाबत विचार करेल. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे, असं ते म्हणाले. 

ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती

अजित पवार म्हणाले की, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती असं तज्ञ म्हणतात. काही गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलं आहे. आता एकदम तडफेनं काम चाललंय. राज्यपाल महोदय अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीसाठी गेलो मात्र ती झाली नाही. आता चार दिवसात किती वेगानं घटना घडला. महाराष्ट्रातील जनता याचा विचार करत आहे, असं अजित पवारांनी म्हटलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

बहुमत प्रस्तावाच्या विरोधात 'मविआ'ला शंभरीही गाठता आली नाही; अशोक चव्हाणांसह 'हे' सदस्य गैरहजर

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

Devendra Fadnavis : ज्यांनी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार, फडणवीसांचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
Gautami Patil :  रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, त्या नेमक्या कोण? पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
Avimukteshwaranand Saraswati on AIMIM: 'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
Gautami Patil :  रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, त्या नेमक्या कोण? पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
Avimukteshwaranand Saraswati on AIMIM: 'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
Sonam Wangchuk: जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार; सोनम वांगचुक यांचा एल्गार, जेलमधून लिहिलं पत्र
जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार; सोनम वांगचुक यांचा एल्गार, जेलमधून लिहिलं पत्र
Sharad Pawar : ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची : शरद पवार
ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची : शरद पवार
एअर इंडिया ड्रीमलाइनरचे इंग्लंडमध्ये आपत्कालीन लँडिंग, टर्बाइन बंद पडली, अहमदाबादमध्ये त्याच मॉडेलचे विमान कोसळून 270 जणांचा जीव गेला
एअर इंडिया ड्रीमलाइनरचे इंग्लंडमध्ये आपत्कालीन लँडिंग, टर्बाइन बंद पडली, अहमदाबादमध्ये त्याच मॉडेलचे विमान कोसळून 270 जणांचा जीव गेला
पोर्शे प्रकरणातील अग्रवालांच्या हॉटेलचं सील काढण्यासाठी कोणत्या नेत्याचा दबाव; तक्रारदार हवालदारांचं म्हणणं काय?
पोर्शे प्रकरणातील अग्रवालांच्या हॉटेलचं सील काढण्यासाठी कोणत्या नेत्याचा दबाव; तक्रारदार हवालदारांचं म्हणणं काय?
Embed widget