(Source: ECI | ABP NEWS)
Gautami Patil : रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, त्या नेमक्या कोण? पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात 30 सप्टेंबरला झाला होता. त्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. गौतमीच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Car Accident) वाहनाचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. हा अपघात 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर झालेला. हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले होते. रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात होती, असा दावा केला आहे. त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केलीय. गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामधून दोन व्यक्ती उतरत असल्याचं पाहायला मिळतं.
Gautami Patil Car CCTV : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ समोर
गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वी सीसीटिव्ही समोर आला आहे. अपघातपूर्वी वाहनातून 2 व्यक्ती खाली उतरल्याचे व्हिडिओ मधून समोर आले आहेत. चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून आधीच खाली उतरल्याचे स्पष्ट झालंय. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबरला अपघात झाला होता.
भोर वरून मुंबईच्या दिशेने एका पेट्रोल पंपाजवळ गौतमीचे वाहन उभे केल्याचे सीसीटिव्ही फुटेज दिसून येते. पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच अपघात झाला होता. गौतमीच्या चालकाने एका रिक्षाला धडक दिल्यामुळे रिक्षा चालक जखमी झाला आहे. अपघातावेळी गाडीत आणखी कोणी होते का याचा तपास सुरु आहे.
अपघातातील जखमी रिक्षाचालक मगराळे याच्या कुटुंबीयांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात तपासाला वेग दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक विशेष अधिकारी नेमणार असल्याचं जाहीर केलं होतं. अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली ? कोणी फोन केला त्याचा तपास केला जाईल. गाडी कुठून आली होती त्याचा तपास केला जाईल. सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.सगळा तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
मगराळे कुटुंबाचे उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रयत्न
गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला त्यात रिक्षाचालक मगराळे जखमी झाले होते. या रिक्षाचालकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोज किमान 70 ते 80 हजार रुपये खर्च होत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता पर्यंत किमान 5 लाख रुपये खर्च झाल्याचा दावा आहे आणि अजून खर्च होणार असल्याच कुटुंबीयांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री सहायता निधी आणि बाकी योजनांसाठी कुटुंबीयांनी कागदपत्र दिले आहेत.
























