एक्स्प्लोर

Sharad Pawar : ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची : शरद पवार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस उत्पादकांना मदतीची अपेक्षा असताना त्यांच्याकडून सक्तीनं वसुली चुकीची असल्याचं म्हटलं.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्यांचं नुकसान झालं त्याच ऊस उत्पादकांकडून मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीला देण्याचा घेतला आहे, असं म्हटलं. ऊस उत्पादाकांकडून सक्तीची वसुली करणं चूक असल्याचंही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरणार असल्याचं म्हटलं.  

राज्यात अतिवृष्टी जी झाली त्यामुळं शेतकरी, पिकं यांचे अतोनात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचे पीक आहे.मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झालं आहे, असं शरद पवार म्हणाले. काही ठिकाणी पीक वाहून गेलं, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या त्यात किती नुकसान झालं आहे, याचा आढावा घेण्याची गरज होती. महाराष्ट्र सरकार ने जास्त मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे, असं पवार यांनी म्हटलं.  

ऊस उत्पादकाकडून सक्तीची वसुली अत्यंत चुकीची :शरद पवार

शरद पवार म्हणाले की, आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारनं नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करण्याच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्या साठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्यावेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांनी या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा, अशी आग्रहाची विनंती त्यांना करणार आहे, असं शरद पवार म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात म्हटलं की, आपण जर विचार केला, या ठिकाणी 200 कारखाने आहेत. फारतर 25 लाख एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्याकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही. काही लोकांनी असा गजहब उभा केला आणि म्हणाले,शेतकऱ्याकडून पैसे तुम्ही वसूल करताय, शेतकऱ्याकडून पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडून नाही तर तुमच्या कारखान्यातील नफ्यातून 25 लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, तो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले  तरी देखील तुम्ही  मागे पुढे पाहता, आता अशे काही कारखाने आम्ही शोधून काढले आहेत, ज्यांच्याकडे शेतकऱ्यांचा काटा मारलो जातो.आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारुन मारुन या ठिकाणी पैसा जमा करता, शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय नेमका काय? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार ऊसबिलातून प्रति टन 15 रुपयांची कपात करुन त्यापैकी 5 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना तर 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाला शेतकरी संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. 

ऊस गाळपातून प्रतिटन मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वसंतदादा साखर संस्था, राज्य साखर संघ, साखर संकुल निधी, गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळ यासाठी कपात केली जाते. नव्या निर्णयानंतर प्रतिटन 27.50 रुपये कपात होणार आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Majha Katta : चुकलं की ठोकणारच, बच्चू कडूंचा थेट इशारा
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 09 Nov 2025 | ABP Majha
Bailgada Sharyat: '४ ते ५ लाख शेतकरी जमणार', सांगलीत चंद्रहार पाटलांचं शक्तिप्रदर्शन
Bhimrao Ambedkar : संविधानवादी पक्षांनी एकत्र यावं, Sharad Pawar यांच्या मंचावरून आंबेडकरांचं आवाहन
Maharashtra Politics: 'तुमच्या शब्दाला किंमत राहिली नाही', Vaibhav Naik यांचा Narayan Rane यांना टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Rishabh Pant Ind vs SA : ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
Maharashtra Weather News: राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज
DSP Richa Ghosh : टीम इंडियाला मिळाली नवी DSP! सिराज-दीप्ती शर्मानंतर वयाच्या 23 वर्षीय ऋचा घोषही पोलीसांच्या वर्दीत दिसणार
टीम इंडियाला मिळाली नवी DSP! सिराज-दीप्ती शर्मानंतर वयाच्या 23 वर्षीय ऋचा घोषही पोलीसांच्या वर्दीत दिसणार
Nanded Crime News : क्रुरतेचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; नांदेडच्या मुखेडमधील संतापजनक घटना
क्रुरतेचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; नांदेडच्या मुखेडमधील संतापजनक घटना
Embed widget