एक्स्प्लोर

Daya Pawar Award : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; नितीन वैद्य, छाया कदम, शरद बाविस्कर आणि संतोष आंधळे यंदाचे मानकरी

Daya Pawar Smriti Award: पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे, पत्रकार संतोष आंधळे हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.तर, प्राध्यापक शरद बाविस्कर यांना 'बलुतं' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Daya Pawar Smriti Award : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा 'पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार' जाहीर झाला आहे. निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याशिवाय, 'भुरा' या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

यंदाच्या वर्षातला पुरस्कार सोहळा हा 20 सप्टेंबर 2022 रोजी  सायंकाळी ५ वाजता मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'स्टँन्ड अप कॉमेडी' कलाप्रकारात एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या बीडच्या अंकुर तांगडे आणि नागपूरच्या नेहा ठोंबरे यांचा 'ब्लु मटेरियल-दलितों का शो(षण)' हा स्टॅन्ड अप कॉमेडीचा प्रयोगही होणार आहे. 

दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी सलग तीन वर्षांचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या गाजलेल्या आत्मकथनाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2018 पासून नावाजलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या तिसऱ्या 'बलुतं' पुरस्कारासाठी 'भुरा' पुस्तकाचे लेखक प्राध्यापक शरद बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक शरद बाविस्कर अध्यापनाचे काम करत आहेत. धुळे ते जेएनयु असा प्रवास सांगणारे त्यांचे 'भुरा' हे पुस्तक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. 

दया पवार स्मृती पुरस्कारांच्या इतर मानकऱ्यांपैकी नितीन वैद्य हे गेल्या तीन दशकांपासून पत्रकारिता, सिनेमा आणि मालिकेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. दशमी क्रिएशन या निर्मिती संस्थेचे संचालक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती, पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि जय भवानी, जय शिवाजी या गाजलेल्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. छाया कदम या आघाडीच्या अभिनेत्री असून गंगुबाई काठियावाडी, झुंड, सैराट, न्यूड, फॅन्ड्री, अंधाधुन या गाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांचे जोरदार कौतुक झाले होते. एका आदिवासी आश्रमशाळेत लिपिक पदावर काम करत असलेल्या अनिल साबळे यांची मराठी काव्यविश्वात एक आंतरिक कळवळ्याचा कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा 'टाहोरा' आणि 'पिवळा पिवळा पाचोळा' हे कविता संग्रह गाजले आहेत. 

दया पवार स्मृती पुरस्काराचे चौथे मानकरी असलेल्या संतोष आंधळे यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय पत्रकारितेमध्ये भरीव कामगिरी केली आहे. समाजामध्ये अवयवदान चळवळीच्या जनजागृतीसाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्याशिवाय समाजातील गरीब रुग्णांचे प्रश्न सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये मांडून त्यास वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले असल्याची माहिती पवार यांनी दिली. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे.

'पद्मश्री दया पवार पुरस्काराने आतापर्यंत प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Embed widget