एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Rain Update | मुंबईत मान्सूनचं दमदार आगमन! मुंबईसह उपनगरात पहिल्याच पावसाने दाणादाण

मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनचं दमदार आगमन झालं आहे. मात्र, या पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईसह उपनगरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवून दिलीय. मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आलीय.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. या पहिल्या पावसाने नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमाऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण झाला. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागांसह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचलं आहे.

Maharashtra Rain Update | मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटींग, जनजीवन विस्कळीत

मुंबईतील किंग सर्कल परिसरामध्ये कमरे इतकं पाणी असून अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. तर एका एसटीमध्ये चालक आणि कंडक्टर गेल्या पाच तासांपेक्षा अधिक काळ अडकून होते. त्यांच्यापर्यंत मदत सुद्धा आली पण पाणी जास्त असल्यामुळे ते पोहोचू शकले नाही. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर याची दखल घेत किंग सर्कल येथे अडकलेल्या एसटी चालक आणि कंडक्टरला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान पोहचले आणि या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आलंय.

हार्बल लाईन ठप्प
मुंबईमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहिला तर जे मुंबईकर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बाहेर पडले होतं आणि ते लोकलचा वापर करत होते त्यांना मात्र घराकडे परतताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत.

ठाणे मुख्यालयासमोर गुडघाभर पाणी 
ठाण्यातील सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. गेले एक ते दोन तास सलग पाऊस पडल्याने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले बघायला मिळत आहे. याच पाण्यातून वाट काढत रहिवाशांना आणि वाहनचालकांना जावे लागत आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

वंदना सिनेमा रोड पाण्याखाली
ठाण्यात थोडादेखील पाऊस पडला तरी हमखास ज्या ठिकाणी पाणी साचते ठिकाण म्हणजे वंदना सिनेमा रोड. या रोडवर आज देखील सकाळपासून झालेल्या पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. त्यामुळे हा संपूर्ण रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इथे पाणी साचल्याने आसपासच्या सोसायटीमध्ये राहणारे रहिवासी आणि घरात अडकून पडले आहेत. एसटी स्टँडमधील बसेस बाहेर पडू शकत नाहीत. तसेच जे नागरिक काही कामासाठी या भागातून जात आहेत त्यांना यापेक्षा जास्त पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget