Mumbai Rain : मुंबईकरांसाठी गुड न्युज.. दोन दिवसांच्या पावसाने मुंबईतील पाण्यात 10.90 टक्के वाढ
मुंबईसह उपनगरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठा 10.90 टक्क्यांपर्यंत वाढल वाढला आहे. सध्याचा साठा मुंबईकरांना पुढील 40 दिवस टिकेल पुरेल एवढा आहे.
Mumbai Water : मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात 10.90 टक्के वाढ झाली आहे. आजच्या पावसाने मुंबईकरांना आणखी पाच दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.
मुंबईसह उपनगरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठा 10.90 टक्क्यांपर्यंत वाढल वाढला आहे. सध्याचा साठा मुंबईकरांना पुढील 40 दिवस टिकेल पुरेल एवढा आहे. मात्र, 27 जूनपासून मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. ही पाणीकपात अजुनही सुरूच आहे.
दोन दिवसात झालेल्या पावसामुळे 21,281 दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईतील तुळशी तलाव (120 मिमी) आणि विहार (112 मिमी) तलावांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. बीएमसी दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवते.
दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. महापालिकेने मुंबईकरांना पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जून महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली . जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे 70 टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजे 9.77 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.
संबंधित बातम्या :
Mumbai Rains : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; लोकल वाहतूक संथ गतीने