Mumbai Corona Update : दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त
Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनारुग्णसंख्या 10 हजारांहून अजूनही अधिकच असल्याने प्रशासन आणि नागरिक चितेंत आहेत.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळणारे रुग्ण कुठेतरी कमी होत आहेत असे वाटत असतानाच ही संख्या 10 हजारांहून अधिकच असल्याने चिंता कायमच आहे. पण आज सापडलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असणं एक दिलासादायक गोष्ट आहे.
मागील 24 तासांत 13 हजार 702 नवे कोरोनाबाधित सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास तीन हजाराने कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 20 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 88 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 426 झाली आहे. कोरोनारुग्णांच्या मागील काही दिवसातील आकडेवारीवर एक नजर..
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी -
तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
24 डिसेंबर | 683 |
25 डिसेंबर | 757 |
26 डिसेंबर | 922 |
27 डिसेंबर | 809 |
28 डिसेंबर | 1377 |
29 डिसेंबर | 2510 |
30 डिसेंबर | 3671 |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
संबंधित बातम्या
-
मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा
- Corona Testing Kit : मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha