एक्स्प्लोर

Mumbai: रायगड प्रतापगडासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या 'या' प्रस्तावासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर

या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22ते 26फेब्रुवारी, 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे.

मुंबई : रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर रवाना झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हे शिष्टमंडळ फ्रान्सच्या पॅरिस शहरात असेल. महाराष्ट्र शासनाने मराठा लष्क्री भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे. (World Heritage Site)

कोणत्या किल्ल्यांचा समावेश?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पुर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री एँड शेलार यांनी आभार मानले आहेत.

महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख

या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22ते 26फेब्रुवारी, 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित होईल, अशी आशा मंत्री एँड आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन सुनिश्चित होईल, असे एँड आशिष शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा:

Maha Shivaratri 2025 : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Supriya Sule : अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला
अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget