एक्स्प्लोर

संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवन बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Shivsena : राज्यसभा निवडणूक निकालानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला याची चर्चा रंगत असताना दुसरीकडे आता कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट केले होते. त्यानंतर आता थेट शिवसेना भवनसमोरच संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश करावा अशी अट घातली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या छत्रपती संभाजी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. 

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेनेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बॅनरवर आहे. त्याशिवाय, 'राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में 2024 अभी बाकी है' असा मजकूर ही या बॅनरवर आहे. 


संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणूक निकालानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी संत तुकाराम यांचा अभंग ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।। या ओळी ट्वीट करत छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला. वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही,असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते असा या अभंगाचा अर्थ आहे. 

महाविकास आघाडीचे आणि शिवसेनेचे राज्यसभा निवडणुकीमधील सहावे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले जात असताना चिंता व्यक्त केली जात आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget