एक्स्प्लोर

शहाजी पाटलांना मंत्रिपद मिळणार का? बापू थेटच म्हणाले, 'आमचं गुवाहाटीतच ठरलंय की...'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. यावर शहाजी बापू काय म्हणाले...

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. संभाव्य मंत्री देखील मुंबईत आले आहेत, सोबत अनेक आमदार देखील आले आहेत. गुवाहाटीत असताना काय झाडी काय डोंगार काय हाटेल या संवादानंतर चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) देखील शपथविधी कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शहाजी पाटील यांनी म्हटलं की,मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना संधी दिली जातेय हे योग्य आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. हे आमचं गुवाहाटीतच ठरलेलं आहे. 50 आमदार मनापासून मान्य करतील. मी आजिबात नाराज नाही. आनंदाने निर्णय मान्य आहे. जुन्याला सोडून आम्हाला संधी कशाला. मला फार मोठी अपेक्षा नाही, असंही शहाजी पाटील म्हणाले.

भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार

भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात एक महिला असणार आहे. पण हे दोन जण कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधिची तयारीही सुरु आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे. 

भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता

दरम्यान आज मंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपतील संभाव्य 9 जणांची नावं समोर येत आहे. पण त्यातही आज भाजपचे 11 जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या महिला आमदार कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती. 

शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
1) उदय सामंत (Uday Sawant)
2) दादा भुसे (Dada Bhuse) 
3) संजय शिरसाट (Sanjay Sirsat)
4) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
5) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
6) भरत गोगावले (Bharat Gogawale)
7) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरीश महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

इतर महत्वाच्या बातम्या 

Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले...

Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द 

Memes : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!' शहाजीबापूंच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget