एक्स्प्लोर

Maharashtra Assembly session Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष, एमआयएम तटस्थ

Maharashtra Politics LIVE :राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

LIVE

Key Events
Maharashtra Assembly session Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष, एमआयएम तटस्थ

Background

Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटात व्हिपवरुन जुंपण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी काल दिली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार काल गोव्याहून मुंबईत दाखल झाले.  हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं.

अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.  विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

कोकणातील शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व राजन साळवी (Know About Rajan Salvi)

राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत.

साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.

2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar) 

शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात 
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार  
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई  

बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची 

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Rahul Narvekar : भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

 

21:08 PM (IST)  •  03 Jul 2022

आजच्या भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांच्या बैठकीत काय झालं ?

भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांची ताज प्रेसिडेंट हॉटेलला रविवारी  बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी होणाऱ्या बहूमत चाचणी संधर्भात चर्चा व आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. सोमवारी बहुमत चाचणीत कोणतीही चुकू नये यावर  दोन्ही गटांच्या आमदारांना विशेष सूचना दिल्या गेल्या. 

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन ही या बैठकीत करण्यात आले.  तसेच उद्या ही बहुमत सिद्ध होईल असा विश्वास दोन्हीं गटाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. यांनतर दोन्ही गटातील आमदारांनी एकत्रित भोजन केले.

21:07 PM (IST)  •  03 Jul 2022

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले - लाड

उद्याच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल चर्चा झाली. आजची निवडणूक जशी विजयी झाली तशीच उद्या पार पडावी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले, असे प्रसाद लाड म्हणाले. 

14:25 PM (IST)  •  03 Jul 2022

विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही? 

विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही? 

 

अनुपस्थित –

१.      मुक्ता टिळक, भाजपा

२.      लक्ष्मण जगताप, भाजपा

३.      नवाब मलिक, राष्ट्रवादी

४.      अनिल देशमुख, राष्ट्रवादी

५.      निलेश लंके, राष्ट्रवादी

६.      दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

७.      दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी

८.      अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

९.      बबनदादा शिंदे, राष्ट्रवादी

१०.  मुफ्ती इस्माईल, एमआयएम

 

पीठासीन अधिकारी –

१.      नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी

 

निधन –

१.      रमेश लटके, शिवसेना

 

तटस्थ –

१.      रईस शेख, सपा

२.      अबू आझमी, सपा

३.      शाह फारूख अन्वर, एमआयएम

14:14 PM (IST)  •  03 Jul 2022

बंडखोरांनी आमच्यापासून नजर चोरली, पण मतदारसंघात शिवसैनिकांसमोर कसे जालं? : आदित्य ठाकरे

विधानसभेबाहेर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आज बंडखोनांनी सभागृहात आमच्यापासून नजर चोरली, पण मतदारसंघात शिवसैनिकांसमोर कसे जालं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

13:17 PM (IST)  •  03 Jul 2022

फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला, थोरातांची टोलेबाजी

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget