VIDEO | आदित्य माझ्या छोट्या भावासारखा, निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंना संजय दत्तकडून शुभेच्छा
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. आदित्य वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आहेत.
मुंबई : अभिनेता संजय दत्तने पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आहेत. आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने जिंकून यावेत, अशी आशा संजय दत्तने व्यक्त केली आहे.
संजय दत्तने यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. बाळासाहेब माझ्यासाठी वडिलांसमान होते. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना केलेली मदत मी कधीही विसरु शकणार नाही. आदित्य ठाकरे माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत. आदित्य मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असं मला वाटतं. देशाला आदित्य यांच्यासारख्या प्रभावी युवा नेत्यांची गरज असल्याचं संजय दत्तने म्हटलं.
Shivsena for one and all !!! Shivsena for Maharashtra !!! First choice and the best choice ???? Love and support for @AUThackeray Ji heartfelt words by @duttsanjay Dutt Sahab ???? together we can... New Maharashtra !!! pic.twitter.com/zl2nmp0fTZ
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) October 15, 2019
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केलेला नाही. ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिलेच सदस्य आहेत. त्यामुळे सर्वांच लक्ष वरळी मतदारसंघावर आहे.