Maharashtra Assembly Budget Session | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता धूसर
अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता धूसर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता कमी आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरु होत आहे.
अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोनाबाधित आहेत. तर गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे नुकतेच कोरोनामुक्त झाले असून ते घरातूनच काम करत आहेत.
दरम्यान यावेळीही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत. राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार याबाबत विचारण केली होती. परंतु या अधिवेशनात ही निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभा अध्यक्षपदी कोण? नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते. अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.
संबंधित बातम्या
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका
अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ : सदाभाऊ खोत