Sarathi | अशी रंगली 'सारथी' संस्थेची बैठक
आज सारथी संस्थेतील बैठकीत बरेच नाट्य घडलेले पाहायला मिळाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेला 8 कोटींचा निधी देऊन सर्व वादाला पुर्णविराम दिला आहे.
मुंबई : सारथी संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची बैठक बोलवली होती. यात सारथी संस्थेला 8 कोटींचा निधी देऊन सर्व वादाला पुर्णविराम दिला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सारथी संस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सारथीचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे आज अजित पवारांनी तातडीनं साराथीसाठी बैठक बोलवली होती. या बैठकीला अजित पवारांसह खासदार संभाजीराजे, मंत्री विजय वड्डेटीवार आणि नवाब मलिक उपस्थित होते. यादरम्यान दोन वेगवेगळया बैठका झाल्या.
पहिल्या बैठकीत काय झालं? सारथीसाठी मंत्रालयातल्या 6 व्या मजल्यावरच्या सभागृहात बैठक बोलवली होती. मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वड्डेटीवार आणि नवाब मलिक बसले होते. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजी राजेही उपस्थित होते. पण छत्रपती सभागृहातल्या तिसऱ्या रांगेत बसले होते. छत्रपतींना तिसऱ्या रांगेत बसलेलं पाहून शिवभक्तांचा राग अनावर झाला. “छत्रपतींना मंचावर बसण्याचा मान दिला पाहिजे” असा आवाज एका कार्यकर्त्यानं देत गोंधळ मांडला. थोडावेळ या बैठकीत काय सुरु आहे, हे कोणालाच कळत नव्हतं. पण, स्वत: छत्रपती संभाजी राजेंनी सामंजस्य भूमिका घेत “मी इकडे समाजाचा सेवक म्हणून आलो आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मानअपमानाचा नाट्य न करता शांत राहावं” अशी विनंती छत्रपती संभाजीराजेंनी घेतली. त्याचवेळी अजित पवार यांनीदेखली “आपल्याला सारथीचा विषय मार्गी लावायचा आहे का उगाच दुसरे विषय काढून मुद्दे भरकटवू नका” असं सांगितलं त्यामुळे पहिल्याच बैठकीत या वादावर पडदा पडला
दुसऱ्या बैठकीत काय घडलं?
पहिल्या बैठकीतल्या गोंधळानंतर अजित पवार यांनी आपल्या दालनात दुसरी बैठक बोलावली. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांनी निवेदन करण्याची संधी दिली. सारथीची स्वायत्ता कायम राहावी तसेच गैरकारभार केलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी, अशा मागण्या छत्रपती संभाजी राजेंनी केल्या तसेच भविष्यात म्हणजे पुढच्या दहा वर्षात 2030 सालापर्यंत सारथीसाठी काय तरतूद करता येईल म्हणजे या काळात सराकरं बदलत गेली तरी सारथीवर काहीही परिणाम होणार नाही अशा प्रकराचं धोरण अवलंबलं पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. त्यावर सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजनच्या अख्त्यारिक्त यावं यासाठीच विचार करण्यात आला.
सारथीसंदर्भात बैठकीत गोंधळ; खासदार छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान
अजित पवार काय म्हणाले?
सारथी संस्थेसाठी तातडीनं 8 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारथी बंद होणार नाही, असं ठोस आश्वासन दिलं. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आजच्या बैठकीच्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच सारथी संस्थेनं केलेला सगळा खर्च संस्थेच्या वेबसाईटवर देण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजे या संस्थेच्या कारभारात पारदर्शकता येईल. सारथी संस्थेच्या कारभारात सुसूत्रता यावी यासाठी दर दोन महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं.
सगळी सोंग करता येतात मात्र पैशाच सोंग करता येत नाही : सारथीबाबत विजय वडेट्टीवारांची भूमिका
सारथी संस्थेला तातडीनं निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीनं बैठक बोलावली आहे. उद्या 11 वाजता ही बैठक मंत्रालयातच होणार असून या बैठकीला खासदार संभाजी राजेही उपस्थित राहणार आहेत. सारथी संस्थेबाबत माझी नाराजी आहे म्हणून तर तातडीनं बैठक लावली, निधीच दिला नाही तर काम कसं करायचं असा सवाल विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला. सगळी सोंग करता येतील पण पैशाचं सोंग करता येत नाही, अशा भाषेत सारथी संस्थेची सध्याची परिस्थिती वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.
SARTHI Meeting | सारथीच्या बैठकीत गोंधळ, जाणूनबुजून छत्रपतींचा अपमान केला : करण गायकर