एक्स्प्लोर
Advertisement
लोकलमध्ये झोपेची डुलकी घेणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
कल्याण: रात्री उशिरा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान लंपास करणाऱ्या चारजणांच्या टोळीतील तिघांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकड़ून 5 मोबाईल आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत,
सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी या आरोपींचा छड़ा लावला. अजूनही काही गुन्हे याटोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे
रात्री उशिरा मुंबई-ठाणे आणि कर्जत-कसारा येथे नोकरीनिमित्त प्रवास करणारे प्रवासी कल्याण डोंबिवलीपर्यंत थोड़ी झोप घेत असतात. अशा प्रवाशांना हेरुन त्यांचे मोबाइल, बॅग, सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या मदतीने या टोळीच्या मोहरक्या सद्दाम सिद्दकीला वांगणी येथून, विवेक नायडू आणि आप्या दांडेकर यांना पोलिसांनी अटक केली. तर चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
दरम्यान, याप्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांनी प्रवास करताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement