एक्स्प्लोर

छोटा राजन टोळीचा गुंड फरीद तनाशाच्या मारेकऱ्यांना जन्मठेप

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येचा आरोप असलेल्या 11 जणांना मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं दोषी ठरवलं आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येचा आरोप असलेल्या 11 जणांना मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी 6 दोषींना हत्या आणि हत्येचा कट रचणे यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य 5 दोषींना मोक्काअंतर्गत 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 2 जून 2010 रोजी चेंबूरमधील टिळक नगर परीसरात दिवसाढवळ्या फरीद तनाशाची त्याच्याच राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी फरीदसोबत त्याची पत्नी आणि मुलगी घरात उपस्थित होती. त्यादिवशी फरीदची तब्येत ठिक नसल्यानं दुपारच्यावेळी तो घरीच होता. अचानक दोन शूटर्सनी घरात घुसून बेडरूममध्ये झोपलेल्या फरीदवर बेछूट गोळीबार केला आणि ते पळून गेले. या हल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता. फरीद अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. एका गुन्ह्यात साल 2005 ते 2008 मध्ये फरीदला जेलची हवाही खावी लागली होती. सरकारी वकिलांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार चेंबूरमधील बिल्डर दत्तात्रय भाकरे यांनी एक भूखंड विकासासाठी घेतला होता. मात्र याला विरोध करत काही त्या सोसायटीच्या काही सभासदांनी फरीदची मदत घेतली. याचा राग येऊन दत्तात्रय भाकरेनं भरत नेपाळी या गँगस्टरला फरीदची सुपारी दिली. यासाठी भाकरेनं नेपाळीला 90 लाख रुपये दिले होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये जफर खान, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांचा समावेश आहे. तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी यांना कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकारKolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Jayant Patil Speech: देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Embed widget