एक्स्प्लोर
अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत बिबट्या घुसला
पश्चिम उपनगरातील अंधेरीत शेर ए पंजाब कॉलनीमध्ये आज रविवारी दुपारी बिबट्या घुसला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. हा बिबट्या एका रिकाम्या क्लासमध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरीत शेर ए पंजाब कॉलनीमध्ये आज रविवारी दुपारी बिबट्या घुसला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. हा बिबट्या एका रिकाम्या क्लासमध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. आज रविवारी अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीतील एका रिकाम्या क्लासमध्ये बिबट्या घुसला. या क्लासमध्ये लहान मुलांची शिकवणी घेतली जाते. आज रविवार असल्यानं हा क्लास रिकामा होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान काहीवेळापूर्वी मुंबई पोलिस आणि वन विभागाची टीम दाखल झाली आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. मुंबईतील भरवस्तीत बिबट्या आल्यानं काहीकाळ या भागात घबराट आणि बघ्यांची गर्दीही होती. आरे कॉलनी शेर ए पंजाब कॉलनी जवळ असल्यानं हा बिबट्या तिकडून आल्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























