एक्स्प्लोर

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याचा हल्ला, चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी होणार, मीरा भाईंदरमध्ये 'त्या' घरात नेमकं काय घडलं, महिलेने सगळंच सांगितलं

Mira-Bhayandar Leopard Attack : अखेर ८ तासांच्या थरारानंतर वनविभागाने त्याला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि परिसरातील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. माहिती मिळताच सकाळपासून परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

मुंबई : पुणे, नागपूरनंतर आता मुंबईत देखील बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. मुंबईतील मीरा भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्ग परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना काल (शुक्रवारी, ता २०) सकाळी घडली. एका इमारतीत जिन्यातून पहिल्या मजल्यावर पोहोचलेला बिबट्या (Mira-Bhayandar Leopard Attack) मागचा दरवाजा उघडा पाहून घरात शिरला (Mira-Bhayandar Leopard Attack) आणि घरामध्ये अडकला. वाटेत त्याने अनेकांवर हल्ले केले. यात सहा जणांना किरकोळ दुखापत झाली, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. अखेर ८ तासांच्या थरारानंतर वनविभागाने त्याला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि परिसरातील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. माहिती मिळताच सकाळपासून परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. दरम्यान, हा बिबट्या नर जातीचा असून साधारण ४ ते ५ वर्षाचा असल्याची माहिती आहे.(Mira-Bhayandar Leopard Attack)

Mira-Bhayandar Leopard Attack : परिसरातील नागरिकांची उडाली धांदल

सकाळी साडेसातच्या सुमारास नागरिकांनी बिबट्याला इमारतीच्या आवारात आणि कुंपणावरून उडी मारताना पाहिले. त्याने दीपू भौमिक (५२) व छगनलाल बागरेचा (४८) यांच्यावर आणि पारस इमारतीत राहणाऱ्या रामप्रसाद सहानी व राकेश यादव यांच्यावर जिन्यात हल्ला केला. त्यानंतर, पहिल्या मजल्यावर भारती टांक यांच्या घरामध्ये तो घुसला.१९ वर्षांची मुलगी खुशबू आणि भारती टांक यांना त्याने लक्ष्य केले. दोघीही घाबरून बाल्कनीच्या लोखंडी जाळीत लपल्या, तर बेडरूममध्ये झोपलेली त्यांची २३ वर्षीय मुलगी अंजली उठून बाहेर आली असता, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचे तोंडाला, हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. ती किंचाळल्याने बिबट्या बाजूला झाला. त्याबरोबर अंजली बेडरूमच्या खिडकीत लपली.(Mira-Bhayandar Leopard Attack)

Mira-Bhayandar Leopard Attack : अंजलीचे लग्न जवळ आले असतानाच तोंडावर जखमा अन्...

घरात लग्नाची लगबग सुरू असताना बिबट्याने हल्ला केल्याने अंजली मानसिक धक्क्यात आहे. चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तिला सुरुवातीला भीमसेन जोशी रुग्णालयात आणि नंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात नेले. तत्पूर्वी अग्निशमन अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह बुद्धा नांगरे, नंदकुमार घरत, मयूर पाटील, अमर पाटील यांनी शिडीच्या साहाय्याने जखमी अंजलीला बाहेर काढले.(Mira-Bhayandar Leopard Attack)

Mira-Bhayandar Leopard Attack : भारती टांक यांनी माहिती देताना सांगितलं की...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अंजलीच्या आईने भारती टांक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आम्ही सगळे बसलो होतो, तेव्हा बिबट्या मागच्या दाराच्या जाळीतून आत आला. तेव्हा आम्ही मी आणि माझी एक मुलगी बाहेर पळालो आणि दुसरी मुलगी रूममध्ये झोपली होती तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. आमचा पुढचा दरवाजा बंद होता मागच्या जाळीतून तो आत मध्ये आला. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या खाली सर्वजण ओरडत होते, तेव्हा मी आणि माझी छोटी मुलगी बाहेर पडलो, तेव्हाच तो मागच्या दारातून आमच्या घरामध्ये घुसला. आम्ही घराबाहेर पडलो पण आमची मोठी मुलगी झोपलेली होती. आवाज ऐकून ती बाहेर आली तेव्हा तिच्यावर बिबट्याने झडप मारली. 

Mira-Bhayandar Leopard Attack : तिसऱ्या प्रयत्नात बेशुद्ध

उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, वन परिक्षेत्र अधिकारी वळवी, काळभोर आदी व कर्मचारी व रोहित मोहिते, संतोष शिंदे यांच्या पथकाने बंदुकीने भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आणखी आक्रमक झाला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात इंजेक्शन लागले आणि तो बेशुद्ध झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget