Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates: अरबी समुद्रात लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न, बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates: पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरातंsss आज लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी...
LIVE
Background
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 9.30 च्या दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती (Lalbaugcha Raja Aarti) होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 च्या दरम्यान, लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Pandal) मंडपातून बाहेर पडताना दिसेल.
लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक (Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk) आज सकाळी 11 वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी 9.30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून केवळ मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आलं आहे.
लालबाग राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे.सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाला गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढली. भाविकांना धक्काबुक्की,मानगुटीला धरून बाजूला फेकणे,भाविकांसोबत हाडामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत. लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्ता कडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीचा संदर्भात काही व्हिडिओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलला जात असल्याचा आपण बघितला आहे. अजूनही तीच परिस्थिती लालबागचा मंडळात दिसून येत आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न, बाप्पा गावाला गेले
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावरुन समुद्रात उतरला, विसर्जन संपन्न
Ganesh Visarjan 2024: लालबागचा राजा यांत्रिक तराफ्यावरुन समुद्रात उतरवण्यात आला. लालबागचा राजा हळूहळू पाण्याखाली जाताना भाविक डोळे भरुन त्याचे रुप डोळ्यात साठवत होते.
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसून खोल समुद्राकडे मार्गस्थ
Lalbaugcha Raja Visarjan 2024 Aarti at girgaon chowpatty VIDEO
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अनंतशेठ अंबानी पाचव्यांदा लालबागचा राजाच्या दर्शनाला, गणपती बाप्पााकडे काय मागितलं? अखेर सांगूनच टाकलं
मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आणि अंबानी कुंटुंबाचे खास नाते आहे. दरवर्षी संपूर्ण अंबानी कुटुंब न चुकता गेली अनेक वर्षे राजाच्या दर्शनसाठी येतात. यंदा तर रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानींनी गणपती बाप्पाकडे काय मागितलं?