VIDEO : लोकांना चिरडलं, रिक्षाला ठोकलं, दुचाकीला नेलं फरफटत; कुर्ला बस अपघाताचा थरकाप उडवणारा आणखी एक व्हिडीओ समोर
Kurla Bus Accident Video : मुंबईतील कुर्ल्यामध्ये 9 डिसेंबर रोजी भीषण बस दुर्घटना घडली, ज्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Kurla Bus Accident CCTV : मुंबईतील कुर्ल्यामध्ये 9 डिसेंबर रोजी बेस्ट बसची भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कुर्ला डेपोतून नेहमीप्रमाणे निघालेली बस अचानक वेगाने धावू लागली आणि समोर येईल त्याला चिरडत अखेर आंबेडकर नगरच्या कमानीचा आदळली. या धक्कादायक बस अपघाताचा थरकाप उडवणारा आणखी सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
कुर्ला बस अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर
कुर्ला बस अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. आता या अपघाताचा आणकी एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. कुर्ला डेपोतून निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. आरोपी बसचालक संजय मोरे याने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय दिला आणि बस रस्त्यावरील सर्वांना चिरडत पुढे निघाली. अरुंद रस्ता, रस्त्याच्या दुर्तफा गर्दी आणि माणसांची वर्दळ, अशात अचानक एक बस लोकांना आणि वाहनांना चिरडत पुढे जात असल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ह्रदय पिळवटून टाकणारा आहे.
कुर्ला बस अपघातातील जखमी दोघांची प्रकृती गंभीर
कुर्ल्यातील भीषण बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 40 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताच्या वेळी बसचा वेग 60 किलोमीटरहून जास्त असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी, प्रवासी आणि जखमी अशा सुमारे 25 जणांचे जबाब नोंदवला आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बसमधील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. बस कंडक्टरचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
अपघातावेळी बसमध्ये काय सुरु होतं?
Mumbai: CCTV footage from inside the BEST bus involved in the Kurla accident has surfaced
— IANS (@ians_india) December 11, 2024
(Date: 09/12/2024) pic.twitter.com/jJhyfuMTVu
महत्त्वाच्या इतर बातम्या :