Kurla Bus Accident: जो-जो समोर आला, त्याला थेट चिरडलं; कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्ट बसनं अनेकांना उडवलं, नेमकं काय घडलं?
Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर
Kurla BEST Bus Accident: मुंबईतल्या (Mumbai Accident) कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla BEST Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झालाय. काल रात्री भरधाव बेस्ट बसनं (BEST Bus) अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की, यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला, तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. विजय विष्णू गायकवाड, आफ्रीन अब्दुल सलीम शहा, अनम शेख, फातिमा गुलाम कादरी, शिवम कश्यप अशी मृतांची नावं आहेत. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (54) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती मिळत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याची माहिती मिळत आहे.
अपघातात 5 जणांचा मृत्यू
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 30 ते 35 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
भरधाव बसचा थरार, अपघात नेमका घडला कसा?
बेस्टची 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. रात्री डीसीपी झोन-5 गणेश गावडे यांनी सांगितलं की, 332 नंबरची बस कुर्ल्यात आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं. अद्याप अपघाताचं कारण पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
बेस्ट बसनं सोमवारी रात्री पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना चिरडलं आणि त्यानंतर थेट एका सोसायटीत घुसली. सध्या तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कुर्ल्यातील एल. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यानं हा अपघात झाला. मार्ग क्रमांक 332 वर बेस्ट बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं बसनं पादचारी आणि काही वाहनांना धडक दिली. यानंतर बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाची बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 12 मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस हैदराबादस्थित 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक'नं बनवली आहे आणि ती बेस्टनं भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा बसेसचे चालक खाजगी चालक पुरवतात.
ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'बस केवळ तीन महिन्यांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात आणण्यात आली आहे. यावर्षी 20 ऑगस्ट रोजी EVEY ट्रान्स नावाच्या कंपनीच्या नावावर नोंद करण्यात आली असून, घटनास्थळी गर्दी असल्यानं त्यांना तपासात अडचण येत असल्याचं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद
कुर्ल्यातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. कालच्या अपघातानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळेच बेस्ट प्रशासनाकडून बेस्ट स्थानक बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
पीडित कुटुंबांना आवश्यक ती सगळीच मदत करावी : वर्षा गायकवाड
कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच प्रार्थना करते. या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काय कारण असेल, हे समोर आलं पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबई काँग्रेस पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून लागेल ती मदत करेल. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, जखमींना तातडीनं उचित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सगळीच मदत करावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :