एक्स्प्लोर

Ashok Kharat : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशारा

Karuna Munde On Rupali Chakankar : रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असल्याने महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली. 

बीड : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर आपण मंत्रालयाच्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.

रुपाली चाकणकरांमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. बलात्कारी अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर दिसतात, त्याच्या संस्थेमध्ये त्या संचालिका आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली. 

महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असं करुणा मुंडे म्हणाल्या. जर सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.

Karuna Munde On Kangana Ranaut : कंगना रनौतवर टीका

दुसरीकडे, करुणा मुंडे यांनी भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली. कंगना रनौत यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला करुणा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, "कंगना रनौत म्हणाल्या की राहुल गांधी टपोरी आहेत, त्यांना पाहिल्यावर महिलांना अस्वस्थ वाटतं. मग तुम्ही त्यांच्याकडे बघताच कशाला? सोनिया गांधींवर कंगनाने शिंतोडे उडवले. पण कंगना किती चरित्रहीन आहे हे गुगलवरचे फोटो पाहून दिसतं. कंगनाचे इंटरनेटवरचे फोटो पाहून अनेक पुरुषांना अस्वस्थ वाटतंय. आगोदर तुम्ही बिकिनीवर फिरत होता, आज तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोलणार का?"

Rupali Chakankar Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी केली.  दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केल्याचं दिसतंय. असं असलं तरी राष्ट्रीवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली. 

अशोक खरात याला महिला आयोग पाठीशी घालत आहे का असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू होता आणि वर्षभरापूर्वी या सगळ्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, त्यावेळी त्यांनी अशोक खरात यांच्यावर नाही तर बातमी छापणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्या संदर्भातलं पत्र देखील आहे असंही विजय कुंभार  म्हणाले. चाकणकर यांनी खरातवर कारवाई केली नाही. याचाच अर्थ हे सगळं घडवण्याचा प्रकार सुरू होता का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget