एक्स्प्लोर

कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा

भायखळा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मुंबई : कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरणी '1 अबव्ह'चे मालक जिगर आणि कृपेश संघवी यांच्या काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोघांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी काकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात येत आहे. भायखळा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. अग्नितांडवात 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं 1 Above पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार : मुख्यमंत्री विनापरवाना हॉटेल पाडायलाच हवे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली. कमला मिल परिसरातील अग्नितांडव ही अतिशय दुर्देवी घटना असून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहतांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे पाच अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिल्सच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी मधुकर शेलार, पदनिर्देशित अधिकारी धनराज शिंदे, ज्युनिअर इंजिनियर महाले, सब इंजिनिअर पडगिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस. एस. शिंदे, अग्निशमन अधिकारी अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी 1 Above हॉटेलची सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने इथे तपासणी करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये अवैधपणे हॉटेल बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1 Above हॉटेलमालक कृपेश संघवी यांना जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये हॉटेलचा अनधिकृत भाग सात दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही हॉटेल अवैधरित्या चालूच होतं.

संबंधित बातम्या

कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस

बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार

अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई

1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान

हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील

कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!

कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...

कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू

मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget