एक्स्प्लोर

मीरा-भाईंदरचा गड भाजपने राखला, महापौरपदी ज्योत्स्ना हसनाळे तर उपमहापौरपदी हसमुख गेहलोत

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डिंपल मेहता यांची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपत होती. यंदाचे महापौर पद अनुसुचित जातीसाठी आरक्षित होते. निवडणुकीत ऐकून 95 नगरसेवकांपैकी 91 नगरसेवकांनी सहभाग नोंदवला होता.

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आणि ढवळून निघालेलं स्थानिक राजकारणानंतर भाजपाने आपला गड शाबूत ठेण्यात यश मिळवलं आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे विजयी झाल्या आहेत. तर उपमहापौर पदी भाजपाचे हसमुख गेहलोत विजयी झाले आहे. माञ यात भाजपा नगरसेविका आणि अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासह भाजपाच्या सहा नगरसेवकांनी भाजपा विरोधात मतदान केलं आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डिंपल मेहता यांची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपत होती. यंदाचे महापौर पद अनुसुचित जातीसाठी आरक्षित होते. निवडणुकीत ऐकून 95 नगरसेवकांपैकी 91 नगरसेवकांनी सहभाग नोंदवला होता. आजच्या या अटीतटीच्या आणि राजकीय उलथापाळथीनंतर भाजपाने आपला गड शाबूत राखण्यात यश मिळवलं आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार अनंत शिर्के यांना 36 मत मिळाली तर भाजपाच्या जोत्स्ना हसनाळे यांना 55 मते मिळाली. तर उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसमधून मर्निल डिसा यांना 35 तर भाजपाचे उमेदवार हसमुख गेहलोत यांना एकूण 56 मते मिळाली आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपा 61, शिवसेना 22, काँग्रेस 12 असे संख्या बळ आहे. महापौर पदासाठी 48 ची मॅजिक फिगर लागणार होती. माञ ऐन निवडणुकीच्या वेळी फक्त 91 नगरसेवक उपस्थित होते. महाआघाडीचे उमेदवार अनंत शिर्के यांना भाजपा नगरसेविका आणि अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासह भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मतदान केलं. तर शिवसेनचे 2, कॉंग्रेसचे आणि भाजपाचे 1 नगरसेवक अनुउपस्थीत होते. तर कॉंग्रेसच्या नगरसेविका उमा सफर यांना अँम्ब्युलन्स मधून महापालिकेत आणण्यात आलं होतं. महाआघाडी आणि भाजपाने एकमेकांवर फोडाफोडीच राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. कॉंग्रेसने तर आपल्या नगरसेविकेला पळवण्याची ही तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. याबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि आमदार गीता जैन तर भाजपाने या निवडणुकांनंतर समिश्र प्रतिक्रिया दिली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या ज्या क्लिपवरून काल दिवसभर वादंग उठलेलं ती क्लिप काढणारी नगरसेविका नीला सोन्स ही या निवडणुकीत पोलीस संरक्षणात हजर होत्या. त्यांनी आपलं मतं भाजपाला दिलं. त्यांनी मीडियाशी बातचीत करताना आपण भाजपाशी प्रामाणिक असल्याच म्हटलं आहे. माञ महापौर पदावरुन माझ्यावर अन्याय झाल्याच यावेळी सांगितलं. क्लिपबद्दल बोलताना मी पूर्णपणे नरेंद्र मेहतांच्या जाळ्यात अडकली आहे. आणि त्यातून निघण्यासाठी मी हे स्टिंग ऑपरेशन केलं असल्याच सांगून आणखीन ही स्टिंग असल्याच सुतवाच केलं आहे. भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहता यांची काल प्रसारीत झालेली अश्लिल क्लिप भाजपाच्या वरिष्ठांना मी दिली होती. आणि त्यांच्याकडून ती वायरल झाल्याचा आरोप आजही नीला सोन्स यांनी केला आहे. याबाबत माञ भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांनी मीडियासमोर काहीही बोलनं टाळलं. तर शिवसेनेच आमदार प्रताप सरनाईक, कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसैन, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी माञ मेहता वर चांगलचं तोडं सुख घेतलं. गीता जैन यांनी तर हा मुद्दा अधिवेशनात उचळणार असल्याचं सांगितलं आहे. Chicken Festival | नाशिकमध्ये चिकन फेस्टिव्हलचं आयोजन; 30 रूपयांत चमचमीत बिर्याणी | ABP Majha संबंधित बातम्या : सांगली महापालिकेच्या महापौर- उपमहापौर पदावर पुन्हा भाजपचंच वर्चस्व महापौर निवडणूक : कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget