एक्स्प्लोर
जियाच्या मृत्यूची SIT चौकशी करा, आईची याचिका कोर्टाने फेटाळली
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचं गूढ अद्यापही उलगडलेलं नाही. जियाच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. जिया खानची आई राबिया खान यांनी ही याचिका दाखल केली होती.
सीबीआयच्या तपासकार्यात कोणताही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं खंडपीठाने सांगितलं आहे. सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुरु असलेली सुनावणी थांबवावी, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत सुरु आहे.
जिया खानची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. मात्र जियाची हत्या तिचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोलीनं केल्याचा राबिया खान यांचा आरोप आहे.
3 जून 2013 रोजी जियाचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी जियाचा कथित बॉयफ्रेण्ड सुरज पांचोलीविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर राबिया खान यांनी जियाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. सीबीआयने जियाने आत्महत्या केल्याचा अहवाल दिल्यानंतर राबिया यांनी हा तपास सीबीआयकडून काढून घेत एसआयटीकडे सोपवण्याची मागणी याचिकेतून केली होती.
राबिया यांनी गेल्या आठवड्यात कोर्टात काही पुरावे सादर केले. यूकेमधील वैद्यकीय अहवाल जियाच्या शरीरावरील खुणा या घातपात घडल्याचं लक्षण असल्याचं दाखवत आहेत, असं राबियांनी सादर केलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement