जनसुरक्षा विधेयकाचं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' ठेवा, उद्धव ठाकरेंचा टोला, म्हणाले, नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कोणासाठी?
जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. राजकीय हेतून विधेयक आणू नका असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. राजकीय हेतून विधेयक आणू नका असे ठाकरे म्हणाले. या विधेयकात नक्षलवाद असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळं या विधेयकाचं भाजप सुरक्षा विधेयक ठेवा असा टोला उद्धव ठाकरे यांनी केला. मिसला टाडा या प्रमाणेच हे विधेयक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. देशविघातक
विधेयकाला राजकीय दुरुपयोगाचा वास
या विधेयकामध्ये राजकीय दुरुपयोगाचा वास येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कोणासाठी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेली केला. शेंडा बुडका नसलेलं हे विधयेक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बेकायदा कृत्य याची स्पष्ट व्याख्या विधेयकामध्ये नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा आणत आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या विधेयकाचे नाव जनसुरक्षा विधेयक असे असले तरी हे विधेयक भाजपच्या सुरक्षेसाठी आणल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशविघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत
जनसुरक्षा कायदा आणला जात आहे. बहुमताच्या जोरावर हा कायदा आणला जात आहे. सांगताना सरकार सांगहत आहे की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे. पण कायद्यात नक्षलवाद असा उल्लेख नाही. विधेयकात कडव्या डाव्या विचारसरणी असा उल्लेख आहे. देशविघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुम्ही राजकीय हेतून विधेयक आणत आहात. यामध्ये राजकीय दुरुपयोगाचा वास येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कुणालाही कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं असे उद्धव ठाकरे म्हणाले. या बिलामध्ये नक्षलवादाचा उल्लेख येणं गरजेचं असल्याचे ठाकरे म्हणाले. या कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल असे ठाकरे म्हणाले.
शेंडा बुडका नसलेलं विधेयक
जो कोणी भाजपविरोधात बोलेल तो देशद्रोही आहे असं त्यांना वाटत असेल तर ते विकृत मानसिकतेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. रस्त्यावर कोणी उतरु नये म्हणू हा कायदा आणल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हे विधेयक शेंडा बुडका नसलेलं आहे. जनसुरक्षेच्या नावाखाली तुम्ही उद्या कोणालाही आत टाकाल असे उद्धव ठाकरे म्हणाले. कडवे डावे म्हणजे काय? असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
महत्वाच्या बातम्या:


















