सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा कायम; अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब
BJP Leader Kirit Somaiya : किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना हायकोर्टानं यापूर्वी दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
![सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा कायम; अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब INS Vikrant Files Bombay HC extends anticipatory bail relief to BJP leader Kirit Somaiya and Neil Somaiya till June 14 Mumbai सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा कायम; अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/cd320fe2f623a27ab59a70e6e364be83_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BJP Leader Kirit Somaiya : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे नगरसेवक पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा 14 जूनपर्यंत कायम ठेवला आहे. पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पितापुत्रांना अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं (High Court) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. यादरम्यान त्यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेले आहेत. यादरम्यान तपासअधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहू अशी कबूली किरीट सोमय्या यांनी स्वत: हायकोर्टात हजर राहून दिली. याची नोंद घेत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपले आधीचेच निर्देश कायम ठेवत सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण?
माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजार 224 रूपयांचा निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे. तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हाजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला?, त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का?, याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.
सोमय्याचा बचावासाठी युक्तिवाद
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोन पक्षा मोठा राजकिय वाद सुरू आहे. त्यामुळेच या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झालेत, हे जगजाहीर आहे, आणि म्हणूनच हे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. हे काही वेगळं सांगायला नको. तसेच साल 2013-14 मध्ये गोळा केलेल्या वर्गणीची साल 2022 मध्ये पावती मागणं यावरून तक्रारदाराच्या हेतूवरही सवाल निर्माण होतो, असंही ते म्हणाले. याशिवाय हा मदतनिधी 57 कोटींचा होता, असा जर दावा करण्यात येत असेल तर जर रस्त्यांवर उभं राहून इतका निधी गोळा होऊ शकतो का?, असा सवाल उपस्थित करत आपण केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा केला होता असा खुलासा सोमय्या यांच्यावतीनं कोर्टात केला गेला आहे. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांनिशी आरोप केले आहेत. त्यानंतर पलटवार करताना 'बापबेटा जेल जाएंगे', या आशयाची वक्तव्य गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्याच दबावाखाली हा गुन्हा दाखल झालाय, असा आरोपही सोमय्यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)