एक्स्प्लोर
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य?

मुंबई: सध्या मुंबई ते पुणे हा प्रवास करण्यासाठी जवळपास तीन तासाचा काळ खर्च करावा लागतो. पण भविष्यात हाच प्रवास आता 15 मिनिटात होण्याची शक्यता आहे. कारण एलन मुस्क यांनी 2013 मध्ये ‘हायपरलूप’ची संकल्पनेचे प्रात्यक्षिक आयआयटी टेकफेस्टमध्ये दाखवण्यात आले. बुलेट ट्रेनपेक्षाही जलद प्रवास करणारी हायपरलूप येत्या काळात भारतात दाखल करण्याचं विद्यार्थ्यांनी पाहिलं असून, या प्रकल्पाची माहिती आयआयटीमध्ये सुरू असलेल्या तंत्र महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ही संकल्पना भारतात कशा प्रकारे राबविता येईल, यासाठी पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील सिबेश कर याने ‘हायपरलूप इंडिया’ नावाचा एक ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या समूहाची स्थापना केली आहे. हायपरलूप म्हणजे काय? एलिव्हेटेड रेल्वेप्रमाणेच उंचावरून तयार केलेल्या मार्गावरून एका पोकळीतून बर्फावर स्किंग केल्याप्रमाणे वेगाने प्रवास करण्याची ही संकल्पना आहे. या प्रवासात उंचावरील नळ्यांच्या पोकळ्यातून केवळ हवेच्या गादीवरून सुमारे 800 मैल प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या मार्गाच्या उभारणीसाठी रेल्वेमार्गापेक्षाही कमी खर्च येतो. अमेरिकेत सर्वप्रथम चाचणी या तंज्ञानाचा यशस्वी प्रयोग मे 2016 मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगासमध्ये करण्यात आला. जवळपास 300 मैल ताशी वेगाने ही ट्रेन धावली. या प्रयोगाची चाचणी लॉस वेगासच्या नेवाडामध्ये घेण्यात आली. त्यामुळे आगामी काळात हे तंत्रज्ञान भारतात आल्यास, मुंबई-पुणे हा प्रवास आता 15 मिनिटात करणे शक्य होणार आहे. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा























