एक्स्प्लोर

कर्जफेडीकरीता मुदतवाढ न मिळाल्यास सर्व वाहने बँकेत जमा करू; वाहतूकदारांचा इशारा

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक व्यवसायिकांनी कर्जफेडीकरीता मुदतवाढ न मिळाल्यास सर्व वाहने बँकेत जमा करू, असा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.

मुंबई : कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगक्षेत्रांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वाहतूक व्यवसाय क्षेत्राला सुद्धा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या वाहतूक क्षेत्रास काही प्रमाणात दिलासा मिळावा याकरीता केंद्र सरकारने कर्ज परतफेडीसाठी अतिरिक्त 4 महिन्यांची (डिसेंबर 2020 पर्यंत) विनाव्याज मुदतवाढ द्यावी अशी मागणी वाहतूकदारांच्या वतीने शिव वाहतूक सेना, मुंबई बस मालक संघटनासह इतर वाहतूक संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास बँकेत आम्ही आमचे वाहने जमा करणार असल्याचे वाहतूकदारांनी सांगितलं आहे. याबाबत शिव वाहतूक सेनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि तशी शिफारस करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन सादर केले होते.

यापूर्वी केंद्र सरकारने मार्च ते ऑगस्ट अशी 6 महिन्यांसाठीची कर्जफेड मुदतवाढ जाहीर केली होती. मात्र, अद्याप कोरोनावरील खात्रीशीर लस बाजारात उपलब्ध झाली नसल्याने तसेच परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात नसल्याने बहुतांश उद्योगधंदे अजूनही ठप्पच आहेत. शिवाय केंद्र सरकारने मार्च 2020 पासून लागू केलेली टाळेबंदी अद्याप पूर्णपणे उठवलेली नाही. मात्र, बँकाकडून कर्जवसुलीसाठी रोज तगादा सुरुच असून कर्जहफ्ते भरण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याची तक्रार वाहतूकदारांनी केली आहे. टाळेबंदीमुळे गेले 6 महिने व्यवसायच नसल्याने घर चालवायचं कसं? असा प्रश्न असताना कर्जाचे हप्ते भरायचे तरी कुठून अशी चिंताजनक व्यथा वाहतूक व्यावसायिक मांडत आहेत.

कलादिग्दर्शकांचे करोडो रुपयांचे नुकसान, व्यवसायाला पूर्वपदावर येण्यास कमीतकमी 2 वर्ष लागणार

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख हजार कोटींच्या पॅकेजमध्ये देखील वाहतूक उद्योगक्षेत्राला आजतागायत काही लाभ मिळालेला नाही. तसेच एमएसएमई कर्जसुविधा देखील वाहतूकदारांना अद्याप मिळालेली नाही, असा आरोप बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया (बोकी), फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स, मुंबई बस मालक संघटना, ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेयर असोसिएशन आणि बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन या वाहतूक संघटनांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आम्हाला कर्जफेडीसाठी विनाव्याज मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात सुमारे 15 लाख ट्रक, 1 लाख बसेस, 3.5 लाख टुरिस्ट टॅक्सी आणि 7.5 लाख ऑटोरिक्षा वाहने आहेत, ज्यापैकी जवळपास 70 ते 80 टक्के वाहने ही विविध बँकाकडून कर्जतत्वावर खरेदी केलेली आहेत. केंद्र सरकारने जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर मात्र पैसे अभावी नाईलाजाने वाहतूकदारांना ही सर्व वाहने बँकेत जमा करण्याखेरीज पर्याय उरणार नाही. परिणामी उद्भवणार्‍या परिस्थितीची जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकारचीच राहील, असा इशारा सर्व वाहतूकदार संघटनांच्या शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस मोहन गोयल यांनी दिला आहे.

Thane Unlock | 15 ऑगस्टपासून ठाण्यातील सर्व दुकाने खुली राहणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Santosh Deshmukh Case | देशमुखांच्या मास्टरमाईंडला सोडणार नाही, अजितदादा म्हणाले....Nashik NCP Banner : माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी बॅनरवरून Chhagan Bhujbal यांचा फोटो गायबMahayuti : खातेवाटपानंतर पालकमंत्री पदाचा तिढा, पुण्यात चंद्रकांत पाटील की अजितदादा कोण पालकमंत्री?Miraj News : मिरजमध्ये 15 वर्षीय विश्वजित चंदनवालेनं गळफास घेऊन संपवलं जीवन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget