एक्स्प्लोर

कलादिग्दर्शकांचे करोडो रुपयांचे नुकसान, व्यवसायाला पूर्वपदावर येण्यास कमीतकमी 2 वर्ष लागणार

कामाचा जवळपास सर्व सीजन लॉकडाऊमध्ये गेल्याने कलादिग्दर्शकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यवसायाला पूर्वपदावर येण्यास कमीतकमी 2 वर्ष लागणार व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

मुंबई : देशासह संपुर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यामुळे अनेक छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. तर अनेक ठिकाणी मागणी अभावी व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशाच प्रकारे कायम दुर्लक्षित असणाऱ्या शिल्पकला व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे. यंदा या व्यवसायिकांना वर्षभर हाताला काम नसल्याचं समोर आलं आहे. या व्यवसायिकांचा वर्षभरातील मोठ मोठे सण, समारंभ यामध्ये गणेशोत्सवात डेकोरेशन तयार करणे, नवरात्री उत्सवात वेगवेगळे सेट तयार करणे, लग्न सोहळ्यात सेट तयार करणे, चित्रपटांचे सेट तयार करणे अशी कामे सुरू असतात. यंदा कोरोनामुळे यातील एकही काम हाताला नसल्याचं समोर आलं आहे. परिणामी लाखो कामगारांवर मागील पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेशमंडळांनी घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात आधी विविध ' मंडळात डेकोरेशन करून देणाऱ्या कला दिग्दर्शकांना आणि कामगारांना हाताला काम उरलेलं नाही. राज्य सरकारने मदत करावी एकीकडे शुटिंग अजूनही म्हणावे असे सुरू नाही, लग्नाचा पुर्ण सीजन टाळेबंदीत गेला आणि आता गणेशोत्सवात काम नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर कुटुंब चालवणं देखील अवघड होऊन गेल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे. नुकतीच याबाबत कला दिग्दर्शक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशा कामगारांसाठी थोड्याफार प्रमाणात मानधन द्यावे, या कलाकारांचे अनेक ठिकाणी पैसे अडकले आहेत. ती मिळवून देण्यासाठी एका समितीची स्थापना करावी. राज्यशासनाच्या सांस्कृती नियोजन समितीत कला दिग्दर्शक संघापैकी एका सदस्याला संधी द्यावी. अशी मागणी केली आहे. यासोबतच़ परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रत्येक्ष भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन देखील दिलं आहे. कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली! लॉकडाऊनमुळे व्यवसाय डबघाईला याबाबत बोलताना कला दिग्दर्शक संघाचे उपाध्यक्ष अमन विधाते म्हणाले की, कोरोना व्हायरसचा राज्यात प्रादुर्भाव राज्यात सुरू झाला आणि याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. आमच्या व्यवसायामध्ये तर वर्षभर आम्ही जे विविध चित्रपट, मालिकांचे शुटिंग, लग्न सोहळ्यासाठी वापरत असणारे सेट्स, गणेशोत्सवाला विविध मंडळांसाठी तयार केलेले सेट जसेच्या तसे पडून आहेत. सध्या सर्वच ठप्प आहे. गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे वर्षभर आम्ही जे साहित्य विविध ठिकाणी वापरत असतो. ते जसेच्या तसं पडून आहे. त्यासाठी जागा भाडं स्वरूपात 50 हजारांपर्यंतची रक्कम महिन्यांला मोजावी लागतेय. एकीकडे काम नाही दुसरीकडे हे व्यवस्थित ठेवणं मोठं जिकरीचं काम होऊन बसलं आहे. सध्या पावसामुळे तर मंडप बांधण्यासाठी आवश्यक असणारे बांबूना वाळवी लागण्यास सुरुवात झालीय तर लोखंडी खांब गंजु लागले आहेत. जर आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर या वस्तूंची काहीच किंमत राहणार नाही. Gym Opening | 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर जीमला परवानगी देऊ- मंत्री विजय वडेट्टीवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget