Chanda Kochhar : कोचर दाम्पत्याला सीबीआय कोठडी; 22व्या वर्षी बँकेत ट्रेनी अन् 47 वर्षी सीईओ अन् आता कोठडीत, चंदा कोचर यांचा थक्क करणारा प्रवास
Chanda Kochar: चंदा कोचर! बस्स…नाम ही काफी है! बँकिंग आणि अर्थविश्वातील मोठं नाव. 2009 साली आयसीआयसीआय बँकेची सूत्रत्यांनी हातात घेतली आणि एकावेगळ्या उंचीवर त्यांनी आयसीआयसीआय बँकेला नेऊन ठेवलं होतं.
Know About Chanda Kochar: चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी कोचर दाम्पत्याला न्यायालयात हजर करणार आहेत. चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आज सीबीआयची टीम कोर्टामधून बीकेसी इथल्या सीबीआयच्या कार्यालयमध्ये आणले आहे. काल कोचर दाम्पत्याला सीबीआयनं अटक केली आहे.
बँकिंग आणि अर्थविश्वात मोठी खळबळ
आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी एमडी आणि सीईओ यांना सीबीआयनं अटक केल्यानंतर बँकिंग आणि अर्थविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. एकेकाळी फोर्ब्सच्या यादीत भारतातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून झळकणाऱ्या चंदा कोचर नेमक्या कोण आहेत? चंदा कोचर! बस्स… नाम ही काफी है! बँकिंग आणि अर्थविश्वातील मोठं नाव. 2009 साली आयसीआयसीआय बँकेची सूत्रत्यांनी हातात घेतली आणि एकावेगळ्या उंचीवर त्यांनी आयसीआयसीआय बँकेला नेऊन ठेवलं होतं. एकेकाळी फोर्ब्सच्या यादीत भारतातील सर्वात शक्तीशाली महिला पैकी एक असलेल्या महिला म्हणून चंदा कोचर तेव्हा झळकल्या होत्या.
मॅनेजमेंट ट्रेनी ते सीईओ पदापर्यंत थक्क करणारा प्रवास
चंदा कोचर यांची 1984 साली मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आयसीआयसीआयमध्ये एन्ट्री झाली. त्यावेळी खासगी बँक म्हणून आयसीआयसीआय स्थापन देखील झाली नव्हती. 90 च्या दशकात आयसीआयसीआयनं बॅंकिंग क्षेत्रात पदार्पण केलं आणि चंदा कोचर याच्या महत्त्वाच्या भाग झाल्या.
कोण आहेत चंदा कोचर? (Know about Chanda Cocchar)
वयाच्या 22 व्या वर्षापासून बँकिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या चंदा कोचर वयाच्या 47 व्या वर्षी सीईओ बनल्या
त्या भारतातील बँकेची सीईओ बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या
त्याआधी बँकेच्या काॅर्पोरेट आणि रिटेल बॅंकिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच होती
काही काळ त्या बँकेच्या सीएफओ पदावर देखील होत्या
2009 साली एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी मिळाल्यावर फोर्ब्सच्या यादीत 100 पैकी 20 व्या स्थानावर होत्या
जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत भारतात सोनिया गांधींनंतर कोचर यांना स्थान देण्यात आलं होतं
2011 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं
आयसीआयसीआय बँकेची मजबूत स्थिती ही चंदा कोचर यांच्यामुळे
अर्थविश्वात आणि बॅंकिंग उद्योगांवरील त्यांची टिप्पणी महत्त्वाची मानली जायची. आयसीआयसीआय बँकेची मजबूत स्थिती ही चंदा कोचर यांच्यामुळे असल्याचं बोललं जातं. सोबतच एकेकाळी त्या सर्वाधिक पगार घेणाऱ्या बँक सीईओंपैकी त्या एक होत्या.
एक काळ असा होता की मॅनेजमेंटचं शिक्षण घेणारे विद्यार्थी चंदा कोचर यांच्याकडे आदर्श म्हणून बघत होते. अशात 2018 साली एका तक्रारीनं चंदा कोचर यांचं आयुष्य पालटलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आणि आज त्या सीबीआय कोठडीत आहे.
ही बातमी देखील वाचा