एक्स्प्लोर

Parambir Singh | परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा शक्यतेवर गृहमंत्री वळसे पाटील म्हणतात..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. दरम्यान, या प्रकरणी आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. कोणत्याही अधिराऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.

अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं  परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत ते डिलिव्हर झालेलं नाही. एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयासोबत परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सरकारी अधिकारी असल्याने देशाबाहेर जाण्याआधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ते जर गेले असतील तर ती चांगली गोष्ट नाही. कोणीही मंत्री असो अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना भारत सरकारच्या परवानगीशिवाय देश सोडता येत नाही. याबाबत केंद्र सरकार काय करेल हे पाहावे लागेल. मात्र, सध्या महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

परमबीर सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार : गृहमंत्री
परमबीर सिंह यांच्यावर वेगवेगळ्या कारणास्त कारवाई होतच राहणार आहे. डिसेंबरमध्ये ॲक्शनबाबत कारवाई होणार, उपस्थित न राहिल्यास कारवाई होऊ शकते, त्यांचे उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नाचा हिशोब त्यांच्याकडून घ्यायचा आहे. रुटींग प्रोसेस आहे आम्ही जाणून बुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही. जे नियमाला धरून असेल तेच होईल, असेही गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, ते बाहेर गेले असल्याची कुठलीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही, आमचे अधिकारी केंद्र सरकारबरोबर समन्वय साधत असल्याचं वळसे पाटील म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget