एक्स्प्लोर

शिवसेनेच्या प्रतिनिधींवर आतापर्यंत झालेले हल्ले आणि हत्या

शिवसेना प्रतिनिधींवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ला झाला आहे. त्या इतिहासावर एक नजर टाकूया...

मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी कांदिवलीत धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. समतानगरमधील राहत्या घरापासून केवळ 200 मीटर अंतरावर अशोक सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास काही बाईकस्वार हल्लेखोरांनी अशोक सावंत यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. अशोक सावंत यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषवलं होतं. तर त्यांची मुलगीही एक वेळा नगरसेवक होती. शिवसेना प्रतिनिधींवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ला झाला आहे. त्या इतिहासावर एक नजर टाकूया... 1990 च्या दशकापासून आजपर्यंतचा हल्ल्यांचा इतिहास - आमदार विठ्ठल चव्हाण यांची परळ येथील राहत्या घरी हत्या. जागेच्या वादातून गुरु साटम गँगनं केली होती हत्या. - आमदार आणि भारतीय कामगार सेना सरचिटणीस रमेश मोरे यांची अंधेरी (पश्चिम) चार बंगला येथे राहत्या घराबाहेर हत्या. अरुण गवळी टोळीला सुपारी देण्यात आली होती. - नगरसेवक खिमबहादूर थापा यांची भांडुपमध्ये टोळीयुद्धातून हत्या - नगरसेवक केदारी रेडकर यांची चिंचपोकळी येथे हत्या, जागेच्या वादातून खून - परळ येथील नगरसेवक विनायक वाबळे यांची हत्या मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या - नगरसेविका आणि अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईकची पत्नी नीता जेठवा-नाईकची घराबाहेर हत्या. कौटुंबिक वादातून हत्या - नगरसेविका अनिता बागवे यांच्या पतीची अंधेरी (पश्चिम) चार बंगला शाखेबाहेर हत्या करण्यात आली होती, जागेच्या वादातून हत्या. - नगरसेवक श्रीकांत सरमळकर यांच्यावर महापालिका मुख्यालयाबाहेर गोळीबार, थोडक्यात बचावले. - माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यावर दोन वेळा दाऊद टोळीने माहीम येथील राहत्या घराबाहेर  प्राणघातक गोळीबार. हल्लेखोरांकडून मशीनगनचा वापर. दोन्ही हल्ल्यात वैद्य गंभीर जखमी झाले होते, पण सुदैवाने वाचले. पण त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना या हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागला होता. - नगरसेवक आणि भारतीय कामगार चिटणीस जयवंत परब यांना खंडणीसाठी अरुण गवळी टोळीकडून धमक्यांचे फोन. परब यांची पोलिसांत तक्रार. पुढे पोलिसांशी झालेल्या चकमकीत परब यांच्याकडे खंडणी मागणारे गुंड्यांचा खात्मा - जागेच्या वादातून नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर असल्फा गाव येथील राहत्या घरात घुसून अरुण गवळी टोळीकडून हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawade Mumbai Tree Collapse : झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटना, प्रश्न विचारताच महापौर संतापल्या , मी गेले दोन महिने फिरतेय मान्सूनपूर्व कामांच्या पाहणीसाठी...
झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटना, प्रश्न विचारताच महापौर संतापल्या , मी गेले दोन महिने फिरतेय मान्सूनपूर्व कामांच्या पाहणीसाठी...
Sachin Ahir : पक्षाने सगळी पदं दिली, मग ठाकरेंची साथ का सोडली? सचिन अहिर यांची कन्या किरण अहिर शाह यांचं थेट प्रत्युत्तर
पक्षाने सगळी पदं दिली, मग ठाकरेंची साथ का सोडली? सचिन अहिर यांची कन्या किरण अहिर शाह यांचं थेट प्रत्युत्तर
Mumbai Rain Death: मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा आणखी एक बळी, कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, मनसैनिक पोलिसांना भिडले
मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा आणखी एक बळी, कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, मनसैनिक पोलिसांना भिडले
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' सचिन अहिरांच्या टीकेवर नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget