(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रुको जरा, सबर करो डायलॉगने प्रसिद्ध, कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
हिंदुस्थानी भाऊ तोच आहे 'जो रुको जरा, सबर करो' या डायलॉगने प्रसिद्धीच्या झोतात आला. एखादं मीम असो किंवा शिवराळ व्हिडीओ, हा हिंदुस्थानी भाऊ तुमच्या आमच्या मोबाईल स्क्रीनवर कधी ना कधी डोकावला आहे.
Hindustani bhau : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकरले आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासाराखा व्हायरल झाला अन् विद्यार्थ्यी रस्त्यावर आंदलानासाठी उतरले. हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडीओमुळे हे आंदोलन झालेय का? यात राजकीय हात आहे का? विद्यार्थ्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण या आंदोलनामुळे हिंदुस्थानी भाऊ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेमका हा हिंदुस्थानी भाऊ आहे कोण? जाणून घेऊयात....
बिग बॉसमध्ये सहभाग -
रुको जरा, सबर करो... हा डायलॉग तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला. आज सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओत हिंदुस्थानी भाऊ दिसतोच. सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 मध्ये हिंदुस्थानी भाऊने सहभाग घेतला होता. हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास फाठक असे आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिलाय.
याआधीही विद्यार्थ्यांसाठी पुकारलं होतं आंदोलन -
कोरोना नियम मोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला बेड्याही ठोकल्या होत्या. दादरमधील शिवाजी पार्कमध्ये गेल्या वर्षी हिंदुस्थानी भाऊ विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, परीक्षा शुल्क माफ करा या मागणीसाठी आंदोलनाला बसला होता. त्यावेळी कोरोना नियमांचं उल्लघंन केलं म्हणून पोलिसांनी भाऊला ताब्यात घेतलं होतं.
पत्रकार झाला यूट्यूबर -
यूट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाठक एक पत्रकार होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विकास फाठक मुंबईमधील एका स्थानिक वर्तमानपत्रात क्राईम रिपोर्टर होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये विकास फाठकला पुरस्कारही मिळाला आहे.
कसा झाला प्रसिद्ध?
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाठकने अश्विनी फाठकशी लग्न केलं. त्याच्या मुलाचे नाव आदित्य आहे. मुलाच्या नावावर हिंदुस्थान भाऊ एक एनजीओही चालवतो. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी विकास फाठक भारत-पाकिस्तान संबधावर यु्टयूब व्हिडीओ तयार करत होता. यामध्ये तो अनेक वादग्रस्त वक्तव्य अन् शिवीगाळही करत होता. त्यामुळे तो अल्पवधीच प्रसिद्ध झाला. ‘पहली फुर्सत में निकल’, रुको जरा, सबर करो हे हिंदुस्थान भाऊचे डायलॉग प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावरही जवळपास प्रत्येक मिम्स अथवा शिवराळ व्हिडीओमध्ये ‘पहली फुर्सत में निकल’, रुको जरा, सबर करो हे डायलॉग दिसतातच.
वेटरचेही केलं काम -
हिंदुस्थानी भाऊ लहान असतानाच वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे लहानपणापासूनच विकास फाठक छोटीमोठी कामं करु लागला. पैशाच्या चणचणीमुळे विकास फाठकला लहानपणीच शाळा सोडावी सोडावी लागली. सुरुवातीला हिंदुस्थानी भाऊने हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरीही केली. तसेच घरोघरी जाऊन अगरबत्तीही विकली.
Hindustani Bhau Video: हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओनंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक?