एक्स्प्लोर
Advertisement
समुद्राला उधाण, आठवडाभर उंच लाटा, चौपाट्यांवर जाणं टाळा
या काळात पर्यटकांनी चौपाटी, समुद्रकिनाऱ्यांवर जाताना सावधानता बाळगावी, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
मुंबई: येत्या 8 सप्टेंबरपासून सलग सहा दिवस अरबी समुद्रात मोठ्या लाटा उसळणार आहेत. या लाटा 4.53 ते 4.85 मीटर उंचीच्या महाकाय लाटा असतील. त्यामुळे या काळात पर्यटकांनी चौपाटी, समुद्रकिनाऱ्यांवर जाताना सावधानता बाळगावी, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
जुलै महिन्यात पावसाने मुंबईला धुतलं होतं. त्यावेळीही समुद्राला उधाण आलं होतं. जुलैमध्ये अरबी समुद्रात जवळपास 5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून समुद्राचं पाणी मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया इथं रस्त्यावर आलं होतं.
बांद्रा, खार, वेसावे आदी कोळीवाड्यात पाणी घुसल्यामुळे अनेक घरांचं नुकसान झाले होतं. आता पुन्हा शनिवार 8 सप्टेंबर ते गुरुवार 13 सप्टेंबरपर्यंत सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. मात्र यावेळी मुंबईत पावसाचा जोर नसल्यामुळे या उधाणाचा फारसा फटका बसणार नाही.
समुद्राला भरती असताना समुद्रकिनारी आणि गिरगाव, दादर, जुहू, गोराई, मार्वे इत्यादीसह सर्वच चौपाटींवर फेरफटका मारणे धोक्याचे आहे, असा इशारा मनपाने दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement