एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईत लॉकडाऊनची भीती! परप्रांतीय मजूर धास्तावले? गावी जाण्यासाठी गर्दी, अफवांचेही पेव

Mumbai Corona lockdown update : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अतिवेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही अफवांनाही पेव फुटला आहे.

Mumbai Corona lockdown update : देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अतिवेगाने वाढत आहे.  काल दिवसभरात मुंबईत 20 हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मिळाली आहे. दुसरीकडे मुंबईच्या कुर्ला लोकमान्य तिलक टर्मिनसचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लॉकडाऊनच्या भीतीमुळे मोठ्या संख्येमध्ये परप्रांतीय मजूरांनी आपल्या गावी जाण्यासाठी कुर्ला टर्मिनसवर गर्दी केली आहे. मात्र या संदर्भात कुर्ला आरपीएफ पोलिसांनी माहिती दिली आहे की रात्री 11 ते बाराच्या सुमारास कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसमधून 6 ट्रेन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाण्यासाठी निघतात. त्या ट्रेनमध्ये तिकिट बुकिंग केलेल्या लोकांना आतमध्ये सोडलं जात आहे. याच ट्रेनमध्ये बसण्यासाठी कुर्ला टर्मिनसवर प्रवाशांचा गर्दी दिसत आहे. या प्रवाशांचे कोरोना नियमांचे सर्व पालन करून ट्रेनमध्ये जायला परवानगी दिली जात आहे,अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. 

मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोविडच्या संकटामुळं लॉकडाऊनच्या संकटाची शक्यता वर्तवली जात आहे. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर परप्रांतियांची गावी जाण्यासाठी गर्दी वाढत असल्याचं समजताच एबीपी न्यूजनं तिथं जाऊन याबाबतची माहिती घेतली. एका व्यक्तिशी चर्चा केल्यानंतर त्यानं सांगितलं की, मी पेंटिंगचं काम करतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं मला माझ्या मालकानं आता काही काम नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच मला गावी जाण्याचं सांगितलं आहे. मी पश्चिम बंगालचा आहे, त्यामुळं तात्काळमध्ये तिकिट काढून गावी परतत असल्याचं मंडल नावाच्या या व्यक्तिनं सांगितलं.  

आणखी काही प्रवाशांशी आम्ही चर्चा केली. अशोक खालखा हे त्यांचे मित्र राम पुजारी, सूरज लाल, साईनाथ यांच्यासह आपल्या राज्यात परतत होते. त्यांना लॉकडाऊनची भीती आहे, ते सर्वजण एक मच्छीमार्केटमध्ये काम करतात.   

सोशल मीडियावरील बातमी खोटी

काल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. ज्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक स्थलांतर करत असल्याचं म्हटलं जात होतं. यामुळं एलटीटीवर मोठी गर्दी झाली झाली असून पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी लाठीचार्ज केला असल्याचं या बातमीत म्हटलं गेलं होतं. याविषयी आम्ही  LTT रेलवे स्टेशनचे RPF अधिकारी केके राणा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, ही बातमी खोटी आहे. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. ज्यांच्याकडे तिकिट आहे, अशाच प्रवाशांना रेल्वेस्थानकात सोडलं जात आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget