एक्स्प्लोर
Advertisement
परळमधील वाडिया ट्रस्टची दोन्ही रूग्णालयं कोविडसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
परळमधील वाडिया ट्रस्टची दोन्ही रूग्णालयं कोविडसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई : मुंबईतील कोविड 19 रूग्णांच्या उपचारासाठी परळमधील वाडिया ट्रस्टची दोन्ही रुग्णालयं ताब्यात घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकादारानं यासंदर्भात एक कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून न्यायालयात जमा करण्याच्या आदेशाची पूर्तता न केल्यामुळे ही याचिका हायकोर्टाकडून नामंजूर करण्यात आली.
वाडिया ट्रस्टच्या वाडिया बाल रुग्णालय आणि मॅटनिटी रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं ताब्यात घ्यावे, अशी मागणी अभिनव भारत काँग्रेसचे पंकज फडणीस यांनी एका याचिकेद्वारे केली होती. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के के तातेड यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. याचिकेतील तथ्य सिद्ध करण्यासाठी पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयात एक कोटी रुपये जमा करा, असे आदेश न्यायालयानं मागील सुनावणीला दिले होते.
Coronvirus | राज्यात आज 2940 नवे कोरोनाबाधित, 99 जणांचा मृत्यू तर, 1084 रुग्णांना डिस्चार्ज
या याचिकेत जनहित दिसत नसल्यानं याचिकाकर्त्यांनं एक कोटी रुपये न्यायालयात जमा करावे, असे आदेश खंडपीठाने दिले होते. याची अमंलबजावणी न झाल्यामुळे न्यायालयानं ही याचिका नामंजूर केली. मुंबई महापालिकेच्यावतीने अॅड. अनिल साखरे, राज्य सरकारच्यावतीने अॅड प्रियभूषण काकडे आणि रुग्णालयाच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ रफिक दादा यांनी याचिकेला विरोध केला होता. सध्या रूग्णालयात कोरोना बाधित बालकांसाठी तीस खाटा आयसीयूमध्ये तैनात केल्याची माहिती यावेळी हायकोर्टाला देण्यात आली.
खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा सरकार ताब्यात घेणार
मुंबईतील कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासकीय रुग्णालये कमी पडत आहेत. त्यामुळ खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान, मुंबईतील अनेक भागात कोविड रुग्णांसाठी क्वॉरंटाईन सेंटर आणि तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 40 हजारांच्या आसपास गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या 6 विभागांमध्ये कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 20 दिवसांवर. पूर्ण मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी (डबलींग रेट) 13 वरुन आता 16 दिवस झाला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील (रिकव्हरी रेट) 43 टक्के वाढला आहे.
Unlock 0.1 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement