Traffic: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी
Traffic: सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
Mumbai-Ahmedabad National Highway Traffic: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झालेल्या अवैध्य माती भरावामुळे सध्या महामार्गावर पाणी साचत आहे. त्याचा परिणाम हा वाहतुकीवर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गाच्या ससूनवघर येथे दोन्ही लेनवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. तासनतास वाहनं महामार्गावर उभी आहेत. ऐन पावसात वसई ते घोडबंदरचा प्रवास करण्यास तीन ते पाच तास लागत आहेत.
वसई विरार आणि मिरा भाईंदर मध्ये सलग सहाव्या दिवशी पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ((Mumbai-Ahmedabad National Highway) ) ससूनवघर येथे दोनशे मिटर अंतरावर पाणी साचत असल्याचने सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकाना करावा लागत आहे. आजही याच ठिकाणी पाणी साचलं असल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. सुरत ते मुंबई लेनवर नायगांव पासून ससूनवघर पर्यंत जवळपास 20 किमी लांब वाहनाच्या रांगा पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे सध्या प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे.या वाहतूक कोंडीमध्ये शाळकरी मुलांच्या बस देखील अडकल्या आहेत. तर नोकरदारांना देखील या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर राँग साईडने शाळकरी मुलांच्या बसला जाण्यासाठी मार्ग मोकळा केला जात आहे.
तर वाहनांच्या रांगा लांब आणि मोठ्या असल्याने नोकरदार वर्गाने महामार्गावरुन चालत जाण्याचा पर्याय स्वीकारल्याचं चित्र सध्या आहे. गुजरात, सुरत, पालघरहून मुंबईकडे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना देखील या वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना देखील जाण्यास त्रास होत आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध्य माती भराव झाले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, ढाबा, औद्योगिक गाळे, वसाहती वसल्या आहेत. त्यासाठी प्रचंड माती भराव करुन, नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. यावर पालिकेने म्हणावा तसा अकुंश ठेवला नाही. ज्या महामार्गावर पाणी साचते त्याच्या बाजूलाच तुंगारेश्वरचा डोंगर आहे. तेथील सर्व पाणी महामार्गावर येते आणि ते पाणी तेथून एक किमी अंतरावर असलेल्या खाडीला मिळते.
डोंगरावरच पाणी वाहून नेण्यासाठी नैसर्गिक नाले होते. पण आता तो नैसर्गिक नाला बुजवून तो स्थलांतरित करुन निमुळता करण्यात आला आहे. सध्या वसई विरार मधील नागरीकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यामुळे माती भरावाला पांठिबा देवून, नैसर्गिक नाले बुजवणा-यांवर आणि त्यांना पाठीशी घालणा-या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.