एक्स्प्लोर

Raj Thackeray : गुणरत्न सदावर्तेंच्या निशाण्यावर ठाकरे! राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : मुलुंड टोल नाका जाळपोळ प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मुंबई : शरद पवार, अजित पवार यांच्यावर सातत्याने बेधडक टीका करणारे डॉ. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आता राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) आघाडी उघडली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरेंविरोधात शिवााजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) तक्रार दाखल केली आहे. मुलुंड येथील टोल नाका (Mulund Toll Plaza) जाळपोळ प्रकरणात राज ठाकरे मास्टरमाईंड असून त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.  

कष्टकरी जनसंघाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी म्हटले की,  महाराष्ट्रात मराठी गुजराती आणि उत्तर प्रदेशातील लोक मिळून राहतात. महाराष्ट्र हा कोण्या एकट्याचा नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी बसून काही वक्तव्य केले. ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील टोलमध्ये झोल झाला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मनसेचा कार्यकर्त्याने मुलुंडमधील टोल नाका जाळला. या सर्व घटनेसाठी राज ठाकरे हे मास्टरमाईंड आहेत. त्यामुळे जाळपोळीसाठी ते जबाबदार आहेत.  म्हणूनच आम्ही या संदर्भात तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आलो असल्याचे डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.  

सीआरपीसी 154 अनुसार राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार घेण्याची मागणी शिवाजी पार्क पोलिसांना केली आहे.  पोलिसांनी आम्हाला  या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सदावर्तेंनी सांगितले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. आणि मनसैनिकाने पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन ही केलं. काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलं होत. मात्र या सर्व प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले. 

मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक, टोल नाक्याप्रकरणी मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई

मुलुंड टोल नाक्यावर (TollNaka) करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी अटक केली. राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अविनाश जाधव आणि इतर मनसैनिकांनी टोल नाक्यावर जात चार चाकी वाहनांना टोल न भरता जाऊ दिले. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांना हटवले. सायंकाळच्या सुमारास एका मनसैनिकाने मुलुंडचा टोलनाका पेटवला. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget