एक्स्प्लोर
Advertisement
मोदींची सत्ता येण्यापूर्वीच गुजरात विकसित होतं : प्रवीण तोगडिया
ज्या गुजरातचं विकसित मॉडेल देशासमोर ठेवून नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्या गुजरातचा विकास हा नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापूर्वीच झाला होता. असे प्रतिपादन नरेंद्र मोदींचे एके काळचे जवळचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.
मुंबई : ज्या गुजरातचं विकसित मॉडेल देशासमोर ठेवून नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्या गुजरातचा विकास हा नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापूर्वीच झाला होता. असे प्रतिपादन नरेंद्र मोदींचे एके काळचे जवळचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात तोगडीया सहभागी झाले होते. यावेळी तोगडीया यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली.
तोगडिया म्हणाले की, मोदींची सत्ता येण्यापूर्वी, भाजपच्या जन्मापूर्वी अगदी इंग्रज भारतात येण्यापूर्वीच गुजरात विकसित राज्य होतं. तीन हजार वर्षांपासून गुजरात विकसित आहे. गुजरातमधील लोक व्यापार करतात. गुजरातमधील प्रत्येक जातीचे लोक व्यापार करण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे राज्याचा विकास झाला आहे.
प्रवीण तोगडिया यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. तोगडिया म्हणाले की, आम्हाला वाटले होते की, भाजपचे नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुळातून आलेले आहेत. त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करतील. परंतु त्यांनी आमची, देशातल्या नागरिकांची फसवणूक केली आहे.
दरम्यान हिदुत्वाच्या मुद्द्यांवरुनही तोगडिया यांनी भाजपला लक्ष्य केले. तोगडिया म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करतो. तसेच हा पक्ष हिंदुंसाठी असल्याच्या वल्गना करत असतो. पण भाजपचं हिंदुत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत"
तोगडिया म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने त्यातही प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर, इंदौरची मशीद, शेतकरी आत्महत्या, देशाच्या विकासाचे आश्वासन यांचा केवळ निवडणुकांसाठी वापर केला आहे. भाजपला यापैकी कोणत्याही गोष्टीशी काहीही देणेघेणे नाही."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement