एक्स्प्लोर

Gudi Padva 2022 : गुढीपाडव्याला डोंबिवलीत साधेपणाने स्वागत यात्रा, ढोल पथकांना परवानगी नाही

गुढीपाडव्यानिमित्त यंदा डोंबिवलीत साधेपणाने स्वागत यात्रा होणार आहे. दीपोत्सव, कोविड काळात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यांसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिक केले जाणार आहेत.

डोंबिवली : गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नववर्ष स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डोंबिवली श्री गणेश संस्थानची नववर्ष स्वागत यात्रा यंदा साधेपणाने करण्याचा निर्णय आला आहे. कोरोनामुळे 2020 आणि 2021 अशी सलग दोन वर्षे या स्वागत यात्रेला ब्रेक लागला होता. यंदा मात्र कोविडची परिस्थिती बऱ्यापैकी निवळली असली तरी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही स्वागत यात्रा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यंदा कोणत्याही प्रकारचे देखावे असणारे रथ या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार नसून साधेपणाने श्री गणेशाच्या पालखीच्या माध्यमातून काढली जाणार आहे. भागशाळा मैदानाऐवजी डोंबिवली पश्चिमेच्या पंडित दिनदयाळ मार्गावरील मारुती मंदिरापासून ही पालखी निघणार आहे. तर यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष असून त्याचे औचित्य साधून संस्कार भारतीतर्फे 75 कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबक अशा 75 रांगोळ्या काढणार आहेत. 

Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व

ढोलपथकांना यात्रेत परवानगी नाही. चौकाचौकात वाजवायला परवानगी दिली जाणार आहे मात्र याबाबत ढोल पथकांनी नियोजन करायचं आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने दीपोत्सव, कोविड काळात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यांसह विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राहुल दामले यांनी दिली.

मराठी नववर्षाची स्वागत यात्रा आणि डोंबिवली हे समीकरण आहे. गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा ही डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने डोंबिवलीकरांनी दोन वर्षांनंतर स्वागत यात्रा काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. पण स्वागत यात्रा होणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विश्वस्तांची एक बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यंदा गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

नाशिकमध्ये स्वागत यात्रा रद्द
रंगपंचमी, दाजीबा वीर मिरवणूक या पाठोपाठ नववर्ष स्वागत यात्रांच्या परवानगीवरुन नाशिक पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांकडे परवानगीसाठी फेऱ्या मारुनही ती मिळत नसल्याने नववर्षाच्या स्वागत यात्रेसह सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. स्वागत यात्रा समितीने शनिवारी (26 मार्च) या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे धुलिवंदन, रंगपंचमी पाठोपाठ गुढीपाडवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या परवानगीवरुन नाशिककर आणि पोलिसांमधील संघर्ष उभा राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget