एक्स्प्लोर
जखमी प्रवाशाला वाचवताना पोलिसाचा लोकलच्या धडकेत मृत्यू

ठाणे : जखमी प्रवाशाला वाचवताना एका कर्तव्यदक्ष जीआरपी पोलिसाला प्राणांना मुकावं लागलं आहे. जखमी प्रवाशाला लोकलमध्ये चढवताना श्रीमंत डोंबाळे यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झालाय. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान एका जखमी प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यासाठी डोंबाळे यांनी त्याला लोकलमध्ये चढवलं. मात्र त्याचवेळी कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचा धक्का लागल्यानं ड़ोंबाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जीआरपीकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. त्यांचं पार्थिव सध्या त्यांच्या मुळगावी सोलापूरला पाठवण्यात आलंय.
आणखी वाचा























