कंगना रनौत प्रकरणाशी माझं काही देणंघेणं नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज राज्यपालांनी आपली भूमिका मांडली.
![कंगना रनौत प्रकरणाशी माझं काही देणंघेणं नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari reaction on Actress Kangana Ranaut controversy कंगना रनौत प्रकरणाशी माझं काही देणंघेणं नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/26095551/koshyari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कंगना रनौत प्रकरणावर मी नाराज नसून त्याच्याशी माझं काही देणंघेणं नसल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. यावर राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचं आज दुपारी 4 वाजता प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राज्यातील अनेक विषयांना हात घातला.
ज्यांना नाव पाठवायचं आहे ते नाव पाठवत नाही आणि राज्यपालांना शिव्या देणार हे बरोबर नाही, असे म्हणत राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन कोश्यारी यांनी सरकारला टोला लगावला. एक वर्ष राहिलो तर चांगलं मराठीत भाषण करु शकेन. जेव्हा मला कळलं मला महाराष्ट्रातच राज्यपाल व्हायचं आहे, तेव्हा विश्वास वाटत नव्हता. इथे आल्यावर राज्यात मुसळधार पाऊस होता. त्यानंतर अतिवृष्टी झाली. निवडणूक झाली, युती झाली व त्यांचे सरकार आले नाही. राज्यात आधी दुष्काळ, मग अतिवृष्टी मग राजकीय पाऊस आला. मात्र, तरीही सर्वांचा स्नेह मिळाला असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; कोलकातामधून एकास अटक
राज्यात राष्ट्रपती शासन लागायला नको होतं. त्याकाळात शेतकरी अडचणीत होता. आंदोलनं होत होती. शेतकऱ्यांना मदत करायची होती. मी ऑर्डर घेऊन यायला सांगितलं. दुपारी तीन साडेतीनला बैठक झाली. प्रति हेक्टर आठ हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर शेतकरी नाराजीबाबत सूर ऐकला नाही. त्यांचा आक्रोश संपला.
मला फिरायला आवडत, महाराष्ट्रात 20 जिल्ह्यात फिरलो. नंतर कोरोना आल्याने सर्व थांबलं. काहींना कोरोनाची भीती वाटते, मी नेहमी सांगतो घाबरू नका, निर्भीड बना. कोरोना नव्हता तोपर्यंत मी प्रयत्न केला. मी गडचिरोली मध्ये जाऊन आलो. नंदुरबारला पण गेलो. मी कोल्हापूरला गेलो तिथे 16 वर्षानंतर पहिल्यांदा 16 वर्षांनी राज्यपाल आले होते. मी रविवारी पण काम करतो.
राजभवनातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला : राज्यपाल
राजभवनाकडे शासनाने लक्षचं दिलं नाही. इथल्या कर्मचार्यांना वेतन आयोग दिला नाही. हे कर्मचारी महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी नाहीत का? विधिमंडळ, कोर्टात वेतन आयोगानुसार वेतन मिळते मग इथे का नाही? मी इथल्या कर्मचार्यांना वेतन आयोग लागू केला आणि मग इथल्या कर्मचार्यांचे पगार वाढले. धोती कुर्तेवाला है तो इसको अंग्रेजी नही आती होगी ऐसे समजते है.
राज्यपालांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही, कोणी विचारलं तर करतो नाहीतर नाही. (मुख्यमंत्री)
- पहाटे रामप्रहर म्हणतात मग कोणी पहाटे शपथ घेतली तर प्रहार का करतात? (शपथविधी)
- सुप्रीम कोर्टाचा आदेश दिला आहे, मंत्री होते कुलगुरू होते. बैठकीत निर्णय झाला ह्यात मी का पडू? (अंतिम वर्ष परीक्षा)
- मी कोणताही संघर्ष आहे, असं मानत नाही, राज्य सरकार आहे त्यांची कमिटमेंट आहे. माझा कोणाशी संघर्ष नाही, सर्व माझे मित्र आहेत. सरकार आपल्या बाजूने प्रयत्न करत आहे. शासनमध्ये असताना निर्णय घेताना तुम्ही जितक्या लोकांना ह्यात सहभागी करू घ्याल तितकं काम चांगलं होतं.
- आतापर्यंत असं बघितलं नव्हतं. संसदेत पण अस झालं नव्हतं. मी बोललो तर माझ्या मागे लोकं पडली. मला वाटलं त्यामुळे तरी तुम्हांला माझी ओळख झाली.
- आता राज्यसभेत नाव घेण्यात रोखलं, म्हणून पत्र लिहिलं. लोकसभेतून माझ्या पत्रावर तात्काळ उत्तर आलं, संविधान हिशोबाने काम झालं पाहिजे. माझ्या चांगल्या कामाने कुणाला वाईट वाटलं तर ठीक आहे. मी राज्यसेवक आहे राज्यपाल नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)