एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतल्या जलाशयांमध्ये आढळला महाकाय विषाणू; आयआयटी मुंबईचे संशोधन
काही दिवासांपूर्वीच मुंबईचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचं एका संस्थेकडून सांगण्यात आलं होतं. अशातच मुंबईतल्या जलाशयांमध्ये एक महाकाय(व्हायरस)विषाणू आढळलाय. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स विभागाने हा विषाणू शोधून काढला आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे, शहरातल्या जलाशयांमध्ये एक महाकाय(व्हायरस)विषाणू आढळलाय. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स विभागातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी हा व्हायरस शोधलाय. मुंबईतल्या पवई तलावांत तसंच, कुर्ला, वांद्रे याठिकाणीही हा विषाणू आढळून आलाय. याला शास्त्रज्ञांनी वांद्रेमेगाव्हायरस, कुर्ला व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे, कुर्ला व्हायरस, पवई लेक व्हायरस अशी नावे दिली आहेत.
हे विषाणू इतर विषाणूंपेक्षा खूप जास्त वेगाने मोठे होत असले तरी यापासून आरोग्याला कोणताही धोका नाही, असंही शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येतंय.
कसा आहे हा महाकाय विषाणू?
सामान्य विषाणूंपेक्षा कित्येक पटींनी हे विषाणू मोठे आहेत. हे व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातात. त्यावेळी ते शरीरातून डीएनएची माहिती कॉपी करतात आणि त्या डीएनएचे दुसऱ्याच्या शरीरात वहन करतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन नुकतेच 'सायन्टिफिक रीपोर्ट्स' या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
शहरातील सांडपाणी, डेअरी युनिटचा जल उपचार प्रकल्प, घरगुती जल शुद्धीकरणापूर्वीचे पाण्याचे नमुने शास्त्रज्ञांनी तपासले. त्याच्यावर अभ्यास केला असता त्यामधून त्यांनी हे महाकाय विषाणू शोधून काढले. यामध्ये 20 नवीन विषाणू आढळून आले.
आधी हा विषाणू कुठे आढळला?
अशा प्रकारचा महाकाय विषाणू यापूर्वी इंग्लंडमध्ये सापडला होता. इंग्लडच्या कुलिंग टॉवरवर सन 1992 मध्ये हा विषाणू सापडला होता. यानंतर या प्रकारच्या विषाणूंचा शोध जगभरातील मोठ्या शहरांमध्ये घेण्यास सुरुवात झाली. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स विभागानं मुंबई शहरातील विविध जलाशयांमधील पाण्याची पाहणी केली. तब्बल पाच वर्षे केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना मुंबईच्या जलाशयांमध्येही हा विषाणू सापडला.
यापूर्वी भारतात निपाह विषाणूने खळबळ माजवली होती
केरळमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने दहाजणांचा मृत्यू झाल्याने देशभर खळबळ माजली होती. डुक्कर, वटवाघुळ आणि दूषित फळांमधून हा आजार पसरत होता. निपाह विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.
हेही वाचा - पोलिओच्या लसमध्ये व्हायरस आढळल्याने खळबळ, एकाला अटक
मुंबई : लेप्टोचा पहिला बळी, कुर्ल्यातील 15 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement