एक्स्प्लोर

वसईत अल्पवयीन अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

पीडित मुलीचे आई वडील नव्हते. वडिलांचा मृत्यू झाला होता. तर सावत्र आईने तिला रस्त्यावर सोडून दिलं होतं. त्यामुळे रस्त्यावर राहून, कुणी खायाला दिल्यावर ते खाऊन, ती आपला उदरनिर्वाह करायची.

वसई :  वसईत एका 17 वर्षीय अनाथ मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.  शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी यातील तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. हे सर्व वसई विरारमध्ये पाण्याचे टॅंकर  चालवतात.  
 
पश्चिम रेल्वेचे डीसीपी प्रदीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकात दिनांक 2 ऑगस्टला तेथील रेल्वे पोलिसांना ही अल्पवयीन पीडित मुलगी प्लॅटफॉर्मवर बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिची चौकशी केली असता, तिच्यावर घडलेला प्रकार लक्षात आला होता. तेथील  पोलिसांनी तिला तात्काळ उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालय भरती केलं होतं. त्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचं उजेडात आलं.
 
दिनांक 7 ऑगस्टला मुंबई सेंट्रल येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 8 ऑगस्टला हा गुन्हा तपासासाठी वसई रेल्वे पोलिसांकडे हस्तातंरीत करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वसई रेल्वेचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब बागल यांनी अवघ्या दोन दिवसातच दिनांक 10 ऑगस्टला पीडित मुलीने सांगितलेल्या पहिल्या नावावरुन, एका आरोपीला अटक केलं. त्यानंतर 13 ऑगस्टला दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात यश मिळवलं. यातील तिसऱ्या  आरोपीला शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्टला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
 
पीडित मुलीचे आई वडील नव्हते. वडिलांचा मृत्यू झाला होता. तर सावत्र आईने तिला रस्त्यावर सोडून दिलं होतं. त्यामुळे रस्त्यावर राहून, कुणी खायाला दिल्यावर ते खाऊन, ती आपला उदरनिर्वाह करायची. आणि खाण्याचं अमिष दाखवूनच या पीडित मुलीवर या तिघा नराधमांनी अत्याचार केला. या मुलीवर आणखी कुणी अत्याचार केले आहेत का? याचा शोध आता वसई रेल्वे पोलीस घेत आहेत. सध्या मुंबईतील रुग्णालयात मुलीवर उपाचार सुरु आहेत. त्यानंतर तिला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget