एक्स्प्लोर
आठवडाभरात मुंबईतील 7 स्टेशन्सवर फ्री वायफाय

मुंबईः रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गुड न्यूज दिली आहे. मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना फ्री वायफाय सुविधा मिळणार आहे. सध्या प्रक्रिया चालू असून आठवडाभरात प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती सुरेश प्रभुंनी ट्विटवरद्वारे दिली आहे.
पनवेल, ठाणे, भायखाळा, खार, वांद्रे, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे सीएसटी या स्थानकांवर फ्री वायफाय सुविधा मिळणार आहे. जानेवारीमध्ये मुंबई सेंट्रल स्थानकावर गुगलने फ्री वायफाय सुविधा द्यायला सुरुवात केली आहे.
https://twitter.com/sureshpprabhu/status/765057057045250048
रेल्वे गुगलच्या साहाय्याने देशभरातील 400 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देणार आहे. याची सुरुवात मुंबईतून झाली आहे. दरम्यान सुरेश प्रभुंनी प्रवाशांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चांगली बातमी दिली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
व्यापार-उद्योग
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















